पूंछमध्ये लष्करी वाहनांवर दहशतवाद्यांचा हल्ला; हवाई दलाचा जवान शहीद, ४ जखमी

By ऑनलाइन लोकमत | Published: May 5, 2024 06:39 AM2024-05-05T06:39:21+5:302024-05-05T06:39:34+5:30

संरक्षण दलाची दोन वाहने सुरणकोट भागातील सनई टॉपकडे जात असताना त्यांच्यावर शशिधर या ठिकाणी दहशतवाद्यांनी हल्ला केला.

Terrorists attack military vehicles in Poonch; Air force jawan martyred, 4 injured | पूंछमध्ये लष्करी वाहनांवर दहशतवाद्यांचा हल्ला; हवाई दलाचा जवान शहीद, ४ जखमी

पूंछमध्ये लष्करी वाहनांवर दहशतवाद्यांचा हल्ला; हवाई दलाचा जवान शहीद, ४ जखमी

जम्मू : जम्मू-काश्मीरमधील पूंछ जिल्ह्यामध्ये शनिवारी संरक्षण दलाच्या दोन वाहनांवर दहशतवाद्यांनी केलेल्या गोळीबारात एका जवानाचा मृत्यू झाला, तर चार  जवान जखमी झाले. ताफ्यातील एक वाहन हवाई दलाचे होते. लोकसभा निवडणुकांच्या सहाव्या फेरीत २५ मे रोजी अनंतनाग-राजौरी मतदारसंघात मतदान होणार आहे. पूंछ हा त्याच मतदारसंघाचा भाग आहे.

संरक्षण दलाची दोन वाहने सुरणकोट भागातील सनई टॉपकडे जात असताना त्यांच्यावर शशिधर या ठिकाणी दहशतवाद्यांनी हल्ला केला. त्यात जखमी झालेल्या जवानांना रुग्णालयात उपचारांसाठी दाखल करण्यात आले आहे. या हल्ल्याचे वृत्त कळताच राष्ट्रीय रायफल युनिटच्या जवानांनी शशिधर भागाला वेढा दिला व दहशतवाद्यांना पकडण्यासाठी मोहीम हाती घेतली. या घटनेत जखमी झालेल्या जवानांची नावे अद्याप कळू शकलेली नाहीत. पूंछ शहरामध्ये व परिसरात दहशतवाद्यांचा वावर असल्याची खात्रीलायक माहिती मिळताच निमलष्करी जवानांनी शुक्रवारपासून त्या शहरात काही ठिकाणी धाडी घातल्या होत्या. मात्र त्यावेळी कोणालाही अटक करण्यात आली नव्हती.

गेल्या वर्षी २१ डिसेंबरला बुफ्लियाझ येथे लष्करी वाहनांवर दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात चार जवान शहीद व तीन जवान जखमी झाले होते. त्यानंतर काही दिवसांतच कृष्णा घाटी येथे दहशतवाद्यांनी लष्करी वाहनांच्या ताफ्यावर गोळीबार केला होता. मात्र, त्यात जीवितहानी वा कोणी जखमी झाले नव्हते. (वृत्तसंस्था)

असे झाले गेल्या काही वर्षांत दहशतवादी हल्ले
nपूंछच्या सीमेवर ढेरा की गली व बुफ्लियाझ या भागादरम्यान गेल्या वर्षी २० एप्रिल रोजी दहशतवाद्यांच्या हल्ल्यात ५ जवान शहीद झाले होते.
nगेल्या वर्षी मे महिन्यात चामेर जंगलात दहशतवादविरोधी मोहिमेत मेजर पदावरील अधिकारी व पाच जवान शहीद झाले.
n२०२२मध्ये राजौरी जिल्ह्यातील दरहाल भागात परघाल येथे लष्करी छावणीवरील हल्ल्यात पाच जवान शहीद झाले होते.
n११ ऑक्टोबर २०२१ रोजी दोन स्वतंत्र हल्ल्यांत नऊ जवान शहीद झाले. १४ ऑक्टोबर रोजी एका हल्ल्यात तीन जवान शहीद झाले होते.

Web Title: Terrorists attack military vehicles in Poonch; Air force jawan martyred, 4 injured

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.