१५ हजार सॅलरी, १० हजारांची लाच अन् घरी सापडले ३० कोटी; वाचा इनसाईड स्टोरी

By ऑनलाइन लोकमत | Published: May 6, 2024 11:08 AM2024-05-06T11:08:33+5:302024-05-06T11:09:39+5:30

ईडीच्या तपासात आलमगीर यांचे खासगी सचिव असलेले संजीव लाल हेदेखील तपासात अडकले.

30 crore found in the servant of Jharkhand minister Alamgir Alam's private secretary | १५ हजार सॅलरी, १० हजारांची लाच अन् घरी सापडले ३० कोटी; वाचा इनसाईड स्टोरी

१५ हजार सॅलरी, १० हजारांची लाच अन् घरी सापडले ३० कोटी; वाचा इनसाईड स्टोरी

रांची - झारखंडच्या रांची इथं ईडीने राज्य सरकारमधील मंत्री आलमगीर आलम यांचे खासगी सचिव यांच्याकडे नोकरी असणाऱ्या जहांगीरच्या घरी धाड टाकली. या नोकराच्या घरी जवळपास २५-३० कोटी रोकड आढळली. मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी तपासात आलमगीर आलम यांचे नाव समोर आले होते. आलमगीर यांच्या मंत्रालयात मोठा भ्रष्टाचार सुरू असून त्यातील पैसा नोकराच्या घरी जात असल्याची माहिती ईडीला मिळाली. 

या माहितीनंतर ईडीने मंत्र्यांच्या खासगी सचिवाच्या नोकराची घरी धाड टाकली. जेव्हा या नोकराच्या घरी कारवाई सुरू होती तेव्हा कुणीही याच्या घरात कोट्यवधीच घबाड सापडेल असा अंदाज बांधला नव्हता. या नोकराला महिन्याला १५ हजार पगार मिळत होता. त्याच्या घरी इतकी रोकड पाहून अधिकारी अवाक् झाले. या नोकराच्या घरी सापडलेली रक्कम मोजण्यासाठी बँकेचे अधिकारी आणि नोटा मोजण्याची मशीन बोलवावी लागली. 

१० हजारांच्या लाचेचं होतं प्रकरण

ईडीने मागील महिन्यात मुख्य अभियंताकडे १० हजारांच्या लाच प्रकरणी धाड टाकली होती. त्या तपासात समोर आले की, मंत्र्यांकडे भ्रष्टाचाराचा पैसा पोहचवला जातो. त्यानंतर पहिल्यांदा झारखंडमधील ग्रामविकास मंत्री आलमगीर आलम यांचे नाव उघड झाले. या तपासात आलमगीर यांचे खासगी सचिव असलेले संजीव लाल हेदेखील तपासात अडकले. आता संजीव लाल यांच्या घरी काम करणाऱ्या नोकराकडे इतक्या मोठ्या प्रमाणात रोकड 

भाजपानं साधला निशाणा

दरम्यान, ईडीच्या कारवाईनंतर भाजपा खासदार निशिकांत दुबे यांनी काँग्रेसवर निशाणा साधला आहे. ते म्हणाले की, आज ईडीच्या कारवाईत झारखंड सरकारमधील मंत्री आलमगीर आलम यांच्या खासगी सचिवाविरोधात मोठी कारवाई झाली आहे. त्यांच्या नोकराकडे ३० कोटीहून अधिक रोकड सापडली. ही काँग्रेस पक्षाच्या भ्रष्टाचाराची कहाणी आहे असं त्यांनी म्हटलं.

Web Title: 30 crore found in the servant of Jharkhand minister Alamgir Alam's private secretary

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.