वारस दाखल्यासाठी खोटे अर्ज व शपथपत्र दिल्याने तिघांविरुद्ध गुन्हा दाखल

By मनोज शेलार | Published: March 24, 2024 05:47 PM2024-03-24T17:47:22+5:302024-03-24T17:47:32+5:30

शितल यांना कुठलाही आर्थिक लाभ मिळू नये हा त्यामागचा उद्देश होता असे फिर्यादीत नमुद करण्यात आले आहे. शितल पावरा यांनी न्यायालयाला ही बाब पटवून दिली.

Case registered against three for giving false application and affidavit for inheritance certificate; | वारस दाखल्यासाठी खोटे अर्ज व शपथपत्र दिल्याने तिघांविरुद्ध गुन्हा दाखल

वारस दाखल्यासाठी खोटे अर्ज व शपथपत्र दिल्याने तिघांविरुद्ध गुन्हा दाखल

नंदुरबार : पत्नीला न सांगता परस्पर वारस दाखल्यासाठी अर्ज करून फसवणूक केल्याप्रकरणी धडगाव येथील मयताची आई व दोन भावांविरुद्ध तळोदा पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

तळोदा न्यायालयाने याबाबत फिर्याद दाखल करण्याचे आदेश दिले होते. त्यामुळे मयताच्या पत्नीच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत शितल निलेश पावरा (२७) रा.रोषमाळ बुद्रूक, ता.धडगाव यांनी फिर्याद दिली आहे. जिरूबाई माणिक पावरा (५७), नागेश माणिक पावरा (२४), महेश माणिक पावरा (२२) यांनी तळोदा न्यायालयात त्यांच्या पतीच्या वारस दाखल्यासाठी ८ जून ते १४ जुलै २०२३ या दरम्यान परस्पर अर्ज केला होता. त्यासाठी खोटे दस्ताऐवज व खोटा अर्ज आणि शपथपत्र तळोदा न्यायालयात सादर केले होते. 

शितल यांना कुठलाही आर्थिक लाभ मिळू नये हा त्यामागचा उद्देश होता असे फिर्यादीत नमुद करण्यात आले आहे. शितल पावरा यांनी न्यायालयाला ही बाब पटवून दिली. त्यानंतर न्यायालयाने तळोदा पोलिसांना याबाबत फिर्याद दाखल करण्याच्या सुचना दिल्या. त्यावरून तिघांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास पोलिस उपनिरिक्षक महेश निकम करीत आहे.

Web Title: Case registered against three for giving false application and affidavit for inheritance certificate;

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.