कचरा जाळणाऱ्यांची तक्रार करणाऱ्यांना धमकी

By admin | Published: September 24, 2015 03:31 AM2015-09-24T03:31:24+5:302015-09-24T03:31:24+5:30

वर्धमाननगर येथे उघड्यावर कचरा जाळणाऱ्यांची तक्रार करणाऱ्यांना धमकी देण्यात आली आहे.

Threats to the garbage complainants | कचरा जाळणाऱ्यांची तक्रार करणाऱ्यांना धमकी

कचरा जाळणाऱ्यांची तक्रार करणाऱ्यांना धमकी

Next

हायकोर्ट संतप्त : प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे निर्देश
नागपूर : वर्धमाननगर येथे उघड्यावर कचरा जाळणाऱ्यांची तक्रार करणाऱ्यांना धमकी देण्यात आली आहे. तक्रारकर्त्याचे नाव मनपाच्या झोनल कार्यालयातून उघड झाले आहे. मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने बुधवारी ही बाब गंभीरतेने घेऊन यासंदर्भात दोन आठवड्यांत सविस्तर स्पष्टीकरण सादर करण्याचे निर्देश महानगरपालिकेला दिलेत.
उच्च न्यायालयाने उघड्यावर कचरा जाळण्याच्या समस्येची स्वत:च दखल घेऊन फौजदारी रिट याचिका दाखल केली आहे. याचिकेवर न्यायमूर्तीद्वय भूषण गवई व प्रसन्न वराळे यांच्यासमक्ष सुनावणी झाली. न्यायालयाने उघड्यावर कचरा जाळण्यास मनाई केली आहे. असे असतानाही शहरात रोज कचरा जाळला जात आहे. यामुळे प्रदूषणाची पातळी वाढून नागरिकांच्या आरोग्यावर वाईट परिणाम होत आहे. अशा परिस्थितीत उघड्यावर कचरा जाळणाऱ्यांची तक्रार करणाऱ्यांनाच धमक्या आल्यास ही समस्या कधीच मुळासकट संपणार नाही ही बाब सुनावणीदरम्यान स्पष्ट करण्यात आली.
न्यायालय मित्र अ‍ॅड. शशिभूषण वाहाणे यांनीही विविध बाबींकडे लक्ष वेधून दोषींवर कठोर कारवाई होणे आवश्यक असल्याचे सांगितले.(प्रतिनिधी)

Web Title: Threats to the garbage complainants

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.