वीज मीटरची तपासणी करणारे महावितरणचेच का? शहानिशा करा महावितरणचे आवाहन

By ऑनलाइन लोकमत | Published: April 24, 2024 04:57 PM2024-04-24T16:57:26+5:302024-04-24T16:58:45+5:30

Nagpur : वीज मीटरची तपासणी करणारे अधिकारी व कर्मचारी हे महावितरणचेच असल्याची खातरजमा करण्यासाठी त्यांच्या ओळखपत्राची करा मागणी; महावितरणचे आवाहन

check if the officer checking your meter is from Mahavitaran or not | वीज मीटरची तपासणी करणारे महावितरणचेच का? शहानिशा करा महावितरणचे आवाहन

MIDC Nagpur

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर :- महावितरणच्या सुरक्षा व अंमलबजावणी, नागपूर परिक्षेत्र कार्यालय अंतर्गत, भरारी पथकाद्वारे विज मिटरची नियमितपणे तपासणी करण्यात येते. तपासणी दरम्यान भरारी पथकाचे अधिकारी आणि कर्मचारी हे महावितरणचेच अधिकारी व कर्मचारी असल्याची खातरजमा करण्यासाठी त्यांच्या ओळखपत्राची मागणी करून शहानिशा करुन तपासणी दरम्यान या कर्मचाऱ्यांना सहकार्य करण्याचे आवाहन महावितरतर्फ़े करण्यात आले आहे.


महावितरणच्या सुरक्षा व अंमलबजावणी, नागपूर परिक्षेत्र कार्यालया अंतर्गत कार्यरत भरारी पथकातील अधिकारी व कर्मचारी यांच्या बाबतीत मिटरच्या तपासणी दरम्यान कुठल्याही प्रकारचा गैरप्रकार आढळून आल्यास त्यांनी उपसंचालक (सुरक्षा व अंमलबजावणी), नागपूर परिक्षेत्र कार्यालय, प्रकाश भवन, लिंक रोड, गड्डीगोदाम, सदर, नागपूर तसेच ईमेल ddvsenr@yahoo.in यावर संपर्क साधण्याचे आवाहन देखील महावितरणतर्फ़े करण्यात आले आहे.

Web Title: check if the officer checking your meter is from Mahavitaran or not

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.