हनुमान चालिसा पठणप्रकरणी राणा दाम्पत्याला तात्पुरता दिलासा

By ऑनलाइन लोकमत | Published: January 19, 2024 09:34 AM2024-01-19T09:34:08+5:302024-01-19T09:34:32+5:30

राजकीय कारकिर्दीला हानी पोहचविण्यासाठी आपल्यावर आरोपपत्र दाखल करण्यात आले आहेत, असे राणा दाम्पत्याने याचिकेत म्हटले आहे.

Temporary relief to Rana couple in Hanuman Chalisa case | हनुमान चालिसा पठणप्रकरणी राणा दाम्पत्याला तात्पुरता दिलासा

हनुमान चालिसा पठणप्रकरणी राणा दाम्पत्याला तात्पुरता दिलासा

मुंबई : माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या ‘मातोश्री’ निवासस्थानाबाहेर हनुमान चालिसा पठणप्रकरणी राणा दाम्पत्यावर आरोप निश्चिती करण्याच्या विशेष न्यायालयाच्या कारवाईला मुंबई उच्च न्यायालयाने गुरुवारी स्थगिती दिली. 

न्या. प्रकाश नाईक यांच्या एकल पीठाने राणा दामपत्याने दाखल केलेल्या याचिकेवरील सुनावणी २१ फेब्रुवारीपर्यंत तहकूब करत तोपर्यंत आरोप निश्चित न करण्याचे निर्देश विशेष न्यायालयाला दिले. खासदार नवनीत राणा व त्यांचे पती आमदार रवी राणा यांच्यावर दाखल करण्यात आलेला गुन्हा रद्द करण्यास विशेष न्यायालयाने नकार दिल्यानंतर त्यांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली.

हनुमान चालिसाचे पठण करण्याचे जाहीर केल्यानंतर पोलिस राणा दाम्पत्याच्या घरी गेले. तेथे त्यांनी अटकेला विरोध केला. त्याप्रकरणी पोलिसांनी त्यांच्यावर गुन्हा दाखल केला. राजकीय कारकिर्दीला हानी पोहचविण्यासाठी आपल्यावर आरोपपत्र दाखल करण्यात आले आहेत, असे राणा दाम्पत्याने याचिकेत म्हटले आहे.

Web Title: Temporary relief to Rana couple in Hanuman Chalisa case

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.