लोकसभेला हिकडं, विधानसभेला तिकडं! अजित पवारांनीही बारामतीत लोकांचा अंदाज सांगितला...

By ऑनलाइन लोकमत | Published: April 17, 2024 06:41 PM2024-04-17T18:41:16+5:302024-04-17T18:41:53+5:30

Ajit pawar on Supriya Sule, Sharad pawar NCP: विधानसभेच्या माध्यमातून निधी आणला, मात्र लोकसभेचा निधी आला नाही. संसदेत नुसती भाषण करून चालत नाही, विकास होत नाही, असा टोला ्जित पवारांनी सुप्रिया सुळेंना लगावला. 

Lok Sabha here, Vidhan Sabha there! Ajit Pawar also admitted, said that this has to be changed baramati people survey | लोकसभेला हिकडं, विधानसभेला तिकडं! अजित पवारांनीही बारामतीत लोकांचा अंदाज सांगितला...

लोकसभेला हिकडं, विधानसभेला तिकडं! अजित पवारांनीही बारामतीत लोकांचा अंदाज सांगितला...

बारामतीत काम करताना अनेकांनी बारामतीचा चेहरा मोहरा बदलण्याचा प्रयत्न केला. सत्तेमध्ये असताना पाचशे कोटी रुपये आणतात येतात सत्तेत नसताना पन्नास कोटीच आणता येतात सत्तेत असल्याचा हा फरक असतो, असे सांगत प्रत्येकाचा वेळ काळ असतो, मला नाही वाटतं कुणी सहा वेळा उपमुख्यमंत्री होईल असे शरद पवारांचे नाव न घेता अजित पवार म्हणाले. 

बारामतीमध्ये वकिलांच्या संघटनेने आयोजित केलेल्या सभेला अजित पवार बोलत होते. तुम्हाला वाईट वाटेल चार वेळा मुख्यमंत्री झाले असताना विकासकामे किती झाली आणि चार वेळा मी उपमुख्यमंत्री असतानाची विकासकामे ही तुमच्या डोळ्यादेखत कुणी केली हे तुम्हाला माहित आहे. त्याकाळामध्ये फॉर्म भरल्यानंतर शेवटची सभा व्हायची मात्र आता माझे सर्व भावंड पायला भिंगरी लावून प्रचार करत आहेत. आता तर काकी (प्रतिभा पवार) प्रचार करताना मला सांगण्यात आले, मी तर डोक्यालाचा हात लावला, असे अजित पवार म्हणाले. 

 मी पंतप्रधान नरेंद्र मोदींकडे बारामती-फलटण रेल्वे करायची मागणी केली होती. त्यांनी लगेच निर्णय घेतला आणि प्रश्न मार्गी लागला. बारामती विधानसभेच्या माध्यमातून निधी आणला, मात्र लोकसभेचा निधी आला नाही. संसदेत नुसती भाषण करून चालत नाही, विकास होत नाही, असा टोला सुप्रिया सुळेंना लगावला. 

बारामतीत लोकांचा अंदाज घेतला त्यावेळी लोकसभेला इकडे आणि विधासभेला तिकडे असे लोकांचे म्हणणे होते. पण मी ठरवले आता हे बदलले पाहिजे आणि हा निर्णय घेतला. लोकसभेला सुनेत्रा अजित पवार उमेदवार दिला. मुलाचा, नातवंडाचा, महिलांचा विचार करा भावनिक होऊ नका देशात हवा मोदींची आहे. गुंडगिरी होऊ दिली नाही. कोयता गँग होऊ दिली नाही. महिलांना सुरक्षित ठेवले, आता मला एवढ्या वेळेस मत द्या, असे आवाहन अजित पवारांनी केले.

Web Title: Lok Sabha here, Vidhan Sabha there! Ajit Pawar also admitted, said that this has to be changed baramati people survey

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.