अल्पवयीन मुलीवर अत्याचार! आई-वडिलांनी केले दुर्लक्ष; पीडीतेच्या धैर्यामुळे आरोपीला अटक

By ऑनलाइन लोकमत | Published: April 17, 2024 08:55 AM2024-04-17T08:55:46+5:302024-04-17T08:55:50+5:30

माणुसकीला काळिमा फासणारी घटना; अल्पवयीन मुलीवर अत्याचार, आरोपीला अटक 

Abusing a minor girl; Parents neglected; The accused was arrested due to the bravery of the victim | अल्पवयीन मुलीवर अत्याचार! आई-वडिलांनी केले दुर्लक्ष; पीडीतेच्या धैर्यामुळे आरोपीला अटक

अल्पवयीन मुलीवर अत्याचार! आई-वडिलांनी केले दुर्लक्ष; पीडीतेच्या धैर्यामुळे आरोपीला अटक

लोकमत न्यूज नेटवर्क, मोहोपाडा : पोटच्या मुलीचे आरोपींकडून लैंगिक शोषण होत असतानादेखील पालकांची मूकसंमती असल्याचा प्रकार रसायनीत समोर आला आहे. पीडित मुलीने धैर्य दाखवून तक्रार दाखल केली असून आरोपी निर्मल चौधरी (रा. त्रिपुरा) याच्यासह पीडित मुलीच्या आईवडिलांना पोलिसांनी अटक केली.

पीडिता चौदा वर्षांची असल्यापासून तिचे लैंगिक शोषण सुरू होते. आरोपी निर्मल चौधरी हा पीडित मुलीच्या आईचा मित्र आहे. जुलै २०२२ पासून आरोपी  पीडितेवर जबरदस्ती करीत होता. पीडितेच्या मोबाईलवर स्वतःचे अश्लील व्हिडीओ पाठविले होते. 

हा सर्व प्रकार आईवडिलांना माहिती असताना त्यांनी काही केले नाही. शेवटी पीडितेने सर्व प्रकार असह्य झाल्यावर रसायनी पोलिस ठाणे गाठत आरोपी निर्मल कुमार आणि आईवडिलांविरोधात तक्रार दाखल केली आहे. याबाबत रसायनी पोलिस ठाण्यात पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल केला असून आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे.

Web Title: Abusing a minor girl; Parents neglected; The accused was arrested due to the bravery of the victim

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.