धावत्या कारमध्ये महिला पोलीस अधिकाऱ्याचा मृत्यू, पती-मुलासमोर घेतला अखेरचा श्वास...

By ऑनलाइन लोकमत | Published: April 23, 2024 02:32 PM2024-04-23T14:32:58+5:302024-04-23T14:33:30+5:30

MP News: भोपाळमध्ये तैनात असलेल्या असिस्टंट इन्स्पेक्टर जनरल प्रतिभा त्रिपाठी यांचे सोमवारी धावत्या कारमध्ये निधन झाले.

MP News, Female police officer AIG Pratibha Tripathi dies in speeding car | धावत्या कारमध्ये महिला पोलीस अधिकाऱ्याचा मृत्यू, पती-मुलासमोर घेतला अखेरचा श्वास...

धावत्या कारमध्ये महिला पोलीस अधिकाऱ्याचा मृत्यू, पती-मुलासमोर घेतला अखेरचा श्वास...

MP News: मध्य प्रदेशची राजधानी भोपाळमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. भोपाळमध्ये तैनात असलेल्या असिस्टंट इन्स्पेक्टर जनरल( AIG) प्रतिभा त्रिपाठी यांचे सोमवारी हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले. प्रतिभा वैद्यकीय तपासणीनंतर इंदूरहून भोपाळला परतत असताना ही घटना घडली. विशेष म्हणजे, धावत्या कारमध्येच त्यांना हृदयविकाराचा झटका आला.

मिळालेल्या माहितीनुसार, सध्या भोपाळमधील महिला कक्षात तैनात असलेल्या एआयजी प्रतिभा त्रिपाठी बऱ्याच दिवसांपासून आजारी होत्या. 2020 मध्ये कोव्हिडच्या पहिल्या लाटेत त्यांना कोरोनाचा संसर्ग झाला होता. प्रतिभा यांनी कोरोनाविरोधातील लढाई जिंकली, पण त्या कोव्हिडनंतर सतत आजारी पडायच्या. त्यांना उच्च रक्तदाबाचा त्रासही होता, ज्यामुळे सातत्याने त्यांची प्रकृती खालावत गेली. कोरोना काळात त्यांनी एका मुलाला जन्म दिला. मुलाला जन्म दिल्यानंतर त्या वैद्यकीय रजेवर होत्या. 

ऑक्टोबर 2023 मध्येच त्या पुन्हा नोकरीवर रुजू झाल्या. अशातच शनिवारी पुन्हा अस्वस्थ वाटू लागल्याने त्यांना इंदूरला नेण्यात आले. तिथे वैद्यकीय तपासणीनंतर पती आणि मुलासह इंदूरहून भोपाळला परतत असताना सोनकच्छजवळ त्यांची प्रकृती खालावली. पतीने त्यांना तातडीने जवळच्या रुग्णालयात नेले, पण तोपर्यंत उशीर झाला होता. डॉक्टरांनी प्रतिभा यांना मृत घोषित केले. त्यांचा मृत्यू कारण हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने झाल्याचे सांगितले जात आहे.

Web Title: MP News, Female police officer AIG Pratibha Tripathi dies in speeding car

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.