इचलकरंजी येथे सभेला गेलेल्या उदय साखर कारखाने संचालक पंडितराव शेळके यांचे निधन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 1, 2024 10:03 PM2024-05-01T22:03:06+5:302024-05-01T22:04:07+5:30

माजी सरपंच पंडितराव बापू शेळके यांचे हृदयविकाराच्या धक्क्याने निधन झाले.

panditrao shelke director of uday sugar factory who attended the meeting at Ichalkaranji passed away | इचलकरंजी येथे सभेला गेलेल्या उदय साखर कारखाने संचालक पंडितराव शेळके यांचे निधन

इचलकरंजी येथे सभेला गेलेल्या उदय साखर कारखाने संचालक पंडितराव शेळके यांचे निधन

लोकमत न्यूज नेटवर्क, बांबवडे: इचलकरंजी येथे सत्यजित पाटील यांच्या सभेसाठी गेलेले उदयसिंगराव गायकवाड सहकारी साखर कारखान्याचे संचालक व डोणोलीचे माजी सरपंच पंडितराव बापू शेळके यांचे हृदयविकाराच्या धक्क्याने निधन झाले.

इचलकरंजी येथे उद्धव ठाकरे यांच्या सभेसाठी पंडितराव शेळके सभास्थळी पोहोचले येथे उमेदवार सत्यजित पाटील यांची भेट घेतली व सभा मंडपात बसण्यासाठी जात असताना अचानक चक्कर आली. त्यांना तत्काळ इंदिरा गांधी सामान्य रुग्णालय येथे हलवण्यात आले.परंतु वाटेतच त्यांची प्राणज्योत मालवली. सभेसाठी आलेले जिल्हा बँकेचे संचालक रणवीरसिंग गायकवाड व डोणोली परिसरातील सर्व कार्यकर्त्यांनी रुग्णालयामध्ये गर्दी केली होती.

Web Title: panditrao shelke director of uday sugar factory who attended the meeting at Ichalkaranji passed away

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.