Crime News: उधारीवर सिगारेट दिले नाही, पानपट्टी चालकावर हल्ला

By सचिन भोसले | Published: November 5, 2022 10:09 PM2022-11-05T22:09:44+5:302022-11-05T22:10:50+5:30

Crime News: उधारीवर सिगारेट देण्यास नकार दिल्याच्या कारणातून नीरजंन वसंतराव ढोबळे (वय ३१, रा. राधाकृष्ण मंदीर, मंगळवार पेठ) या पानपट्टी चालकांस धारदार शस्त्रांनी हल्ला करून जखमी केले.

Crime News: Cigarettes not paid on loan, Panpatti driver attacked | Crime News: उधारीवर सिगारेट दिले नाही, पानपट्टी चालकावर हल्ला

Crime News: उधारीवर सिगारेट दिले नाही, पानपट्टी चालकावर हल्ला

Next

- सचिन भोसले
 कोल्हापूर : उधारीवर सिगारेट देण्यास नकार दिल्याच्या कारणातून नीरजंन वसंतराव ढोबळे (वय ३१, रा. राधाकृष्ण मंदीर, मंगळवार पेठ) या पानपट्टी चालकांस धारदार शस्त्रांनी हल्ला करून जखमी केले. याप्रकरणी जुना राजवाडा पोलिसांनी चार अल्पवयीन संशयितांना शनिवारी सायंकाळी ताब्यात घेतले.

पोलिसांनी सांगितलेली माहिती अशी की, जयप्रभा स्टुडीओ नजीकच्या पद्मावती मंदीराजवळ निरंजन ढोबळे राहतात. त्यांची तेथेच पानपट्टी आहे. शनिवारी सायंकाळी पाच वाजता त्यांनी पानपट्टी उघडली. या दरम्यान चार अल्पवयीन संशयित तेथे आले. त्यांनी निरंजन यांना उधारीवर सिगारेट  देण्याची मागणी केली. मात्र, निरंजन यांनी सिगारेट देण्यास नकार दिला. या रागातून या संशयितांना त्यांच्यावर धारदार शस्त्रानिशी हल्ला केला. त्यात ढोभळे यांच्या डोक्यावर गंभीर इजा झाली. तर उजव्या हाताची दोन बोटे तुटली. हल्यानंतर संशयितांनी पलायन केले. गंभीर जखमी अवस्थेत ढोबळे यांना सीपीआर रुग्णालयात दाखल करण्यात आले. दरम्यान जुना राजवाडा पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक दत्तात्रय नाळे, उपनिरीक्षक अभिजीत इंगळे आणि सहकाऱ्यांनी ४ संशयितांना ताब्यात घेतले. हे सर्वजण अल्पवयीन आहेत.

Web Title: Crime News: Cigarettes not paid on loan, Panpatti driver attacked

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.