Kolhapur: देणेकऱ्यांची नावे शरीरावर लिहून कबनूरमधील वृद्धाने संपवले जीवन

By ऑनलाइन लोकमत | Published: April 20, 2024 04:27 PM2024-04-20T16:27:46+5:302024-04-20T16:29:01+5:30

शिवाजीनगर पोलिस ठाण्यात घटनेची नोंद

An old man ended his life by writing the names of debtors on his body in Kabanur Kolhapur | Kolhapur: देणेकऱ्यांची नावे शरीरावर लिहून कबनूरमधील वृद्धाने संपवले जीवन

Kolhapur: देणेकऱ्यांची नावे शरीरावर लिहून कबनूरमधील वृद्धाने संपवले जीवन

इचलकरंजी : देणेकऱ्यांची नावे शरीरावर लिहून कबनूर (ता. हातकणंगले) येथील एका वृद्धाने शेतातील झाडास गळफास घेऊन आत्महत्या केली. बाळू गंगाराम कांबळे (वय ६२, रा. सिद्धार्थ हाउसिंग सोसायटी) असे त्याचे नाव आहे. या घटनेची नोंद शिवाजीनगर पोलिस ठाण्यात झाली आहे.

याबाबत पोलिसांतून मिळालेली माहिती अशी, सिद्धार्थ हाउसिंग सोसायटीत बाळू कांबळे राहण्यास होते. कबनुरातील एका शेतातील झाडास त्यांनी गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे गुरुवारी (दि.१८) रात्री निदर्शनास आले. पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह नातेवाइकांच्या ताब्यात दिला. 

कांबळे यांनी आपल्या शरीरावर काळ्या रंगाने काही जणांची नावे आणि देणी लिहिली असल्याची चर्चा आहे. त्यांनी शरीरावर लिहिलेल्या मजकुरासंदर्भात नातेवाइकांचे म्हणणे घेऊन पुढील कारवाई करण्यात येईल, असे प्रभारी पोलिस निरीक्षक प्रवीण खानापुरे यांनी सांगितले.

Web Title: An old man ended his life by writing the names of debtors on his body in Kabanur Kolhapur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.