142 कल्याण पूर्व मतदार संघातील गावात वासूदेवांमार्फत पथनाट्याद्वारे मतदान जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन

By अनिकेत घमंडी | Published: May 4, 2024 03:22 PM2024-05-04T15:22:06+5:302024-05-04T15:22:45+5:30

लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 अंतर्गत 24 कल्याण लोकसभा या 142 कल्याण पूर्व विघानसभा मतदार संघात मतदार जनजागृतिसाठी विविध जनजागृतीपर स्वीप कार्यक्रमाची अंमलबजावणी ठिकठिकाणी होत आहे.

Organized voting awareness program through street theater through Vasudeva in 142 villages of Kalyan East Constituency | 142 कल्याण पूर्व मतदार संघातील गावात वासूदेवांमार्फत पथनाट्याद्वारे मतदान जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन

142 कल्याण पूर्व मतदार संघातील गावात वासूदेवांमार्फत पथनाट्याद्वारे मतदान जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन

डोंबिवली: लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 अंतर्गत 24 कल्याण लोकसभा या 142 कल्याण पूर्व विघानसभा मतदार संघात मतदार जनजागृतिसाठी विविध जनजागृतीपर स्वीप कार्यक्रमाची अंमलबजावणी ठिकठिकाणी होत आहे. याच अनुषंगाने 142 कल्याण पूर्वचे सहा. निवडणूक निर्णय अधिकारी गोपीनाथ ठोंबरे आणि अति.सहा. निवडणूक निर्णय अधिकारी डॉ. स्वाती घोंगडे यांचे मार्गदर्शनाखाली आज स्वीप पथकातील (मतदार जनजागृतीपथक) महापालिकेचे शिक्षणाधिकारी तथा नोडल अधिकारी विजय सरकटे (स्वीप) यांच्या अधिपत्याखाली 142 कल्याण पूर्व विधानसभा मतदार संघातील डावलपाडा, वसार, मानेरे, आशेळे, खडेगोळवली या गावात जाऊन वासूदेवांमार्फत पथनाटय सादर करुन मतदारांना मतदान करणेबाबत आवाहन करण्यात आले.

सदर ठिकाणी मोठया प्रमाणात नागरिकांनी “आम्ही मतदान करणार आणि तुम्ही पण मतदान करा” अशा घोषणा दिल्या. या ठिकाणी लाऊडस्पिकरद्वारे मतदान जनजागृतीपर गीत वाजवून मतदान करणेबाबतचा संदेश गावातील  नागरिकांना देण्यात आला. यावेळी स्वीप टीमचे कर्मचारी  स्टुडंट ऑयकान प्रणव देसाई, समाधान मोरे, विलास नंदनवार, सर्जेश वेलेकर, अजय खंडाळे, मीडिया टिमचे उमेश यमगर, निलेश चव्हाण उपस्थित होते.

Web Title: Organized voting awareness program through street theater through Vasudeva in 142 villages of Kalyan East Constituency

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.