पारोळा तालुक्यातील तरडी येथे तरुण शेतकऱ्याचा सर्पदंशाने मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 1, 2019 03:38 PM2019-12-01T15:38:48+5:302019-12-01T15:39:46+5:30

तरडी येथील समाधान ईश्वर पाटील (२४) या तरुण शेतकºयाचा सर्पदंशाने रविवारी सकाळी सहाला मृत्यू झाला.

Young farmer dies of snake bite at Tardi in Parola taluka | पारोळा तालुक्यातील तरडी येथे तरुण शेतकऱ्याचा सर्पदंशाने मृत्यू

पारोळा तालुक्यातील तरडी येथे तरुण शेतकऱ्याचा सर्पदंशाने मृत्यू

googlenewsNext
ठळक मुद्देशेतात पिकांना पाणी भरत असताना सर्पाने केला दंशमित्र दवाखान्यात नेत असताना त्याआधीच झाला अंत

पारोळा, जि.जळगाव : तालुक्यातील तरडी येथील समाधान ईश्वर पाटील (२४) या तरुण शेतकºयाचा सर्पदंशाने रविवारी सकाळी सहाला मृत्यू झाला.
तो रविवारी सकाळी सहाला स्वत:च्या शेतात पिकांना पाणी भरणा करीत होता. तेव्हा त्यासा विषारी सर्पाने दंश केला. तो त्या अवस्थेत घरी येत असताना रस्त्यावर कोसळला. मित्रांनी त्याला त्या अवस्थेत घरी आणले. नंतर डॉक्टरांकडे घेऊन जात होते. मात्र त्याआधीच त्याचा मृत्यू झाला.
त्यास पारोळा कुटीर रुग्णालयात दाखल केले. वैद्यकीय अधिकारी डॉ.साळुंखे यांनी त्यास मृत घोषित केले. त्याच्या पश्चात आई-वडील व एक भाऊ असा परिवार आहे. घरचा कर्ता मुलगा गेल्याने आई-वडिलांनी एकच हंबरडा फोडला. शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले.

 

Web Title: Young farmer dies of snake bite at Tardi in Parola taluka

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.