विद्यापीठात होणार विद्यार्थ्यांच्या मानसिक आरोग्याचा अभ्यास अन् उपचारही!

By अमित महाबळ | Published: November 6, 2023 04:27 PM2023-11-06T16:27:07+5:302023-11-06T16:27:26+5:30

महाराष्ट्रातून जी सहा केंद्रे निवडली आहेत, त्यामध्ये जळगावच्या विद्यापीठाचा समावेश आहे. 

Study and treatment of students' mental health will be done in the university! | विद्यापीठात होणार विद्यार्थ्यांच्या मानसिक आरोग्याचा अभ्यास अन् उपचारही!

विद्यापीठात होणार विद्यार्थ्यांच्या मानसिक आरोग्याचा अभ्यास अन् उपचारही!

जळगाव : कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ आणि महाराष्ट्र राज्य अध्यापक विकास अकादमी, पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने विद्यापीठात युवा मानसरंग क्लबची स्थापना करण्यात आली असून, विद्यार्थ्यांच्या मानसिक आरोग्याचा अभ्यास करून भावनिक प्रथमोपचाराचे काम या क्लबच्या माध्यमातून केले जाणार आहे. त्यासाठी महाराष्ट्रातून जी सहा केंद्रे निवडली आहेत, त्यामध्ये जळगावच्या विद्यापीठाचा समावेश आहे. 

परिवर्तन संस्था, सातारा यांच्या सहकार्याने हा कक्ष कार्यान्वित झाला आहे. कक्षाचे उद्घाटन करतांना कुलगुरू प्रा. व्ही. एल. माहेश्वरी म्हणाले, की प्रत्येक क्षेत्रात वाढत असलेली स्पर्धा, वाढता दबाव, कुटुंबात परस्पर संवादाचा असलेला अभाव, व्यायामाकडे असलेले दुर्लक्ष आणि फास्ट फुडच्या आहारी जाण्याची वाढती संख्या यामुळे तरूण पिढीचे मानसिक आरोग्य ढासळत असून, यातून बाहेर पडण्यासाठी स्वत: मधील क्ष्मता ओळखा, इतरांसोबत स्वत:ची तुलना करू नका आणि कोणत्याही दबावाखाली काम करू नका. नवीन शैक्षणिक धोरणात भावनिक बुध्दीमत्ता आणि विश्लेषणाची तयारी असणारा विद्यार्थी तयार करण्याचा हेतू आहे. विद्यापीठात स्थापन होणाऱ्या मानसरंग कक्षामार्फत विद्यार्थ्यांचे मानसिक आरोग्य उत्तम राखण्याचा प्रयत्न होईल, अशी अपेक्षा कुलगुरूंनी व्यक्त केली. प्रा. अतुल बारेकर, प्रियंका पवार यांनी मनोगत व्यक्त केले. सूत्रसंचालन डॉ. वीणा महाजन यांनी केले. प्रा. उमेश गोगडीया यांनी आभार मानले. योगिनी मगर, परिवर्तन संस्थेचे कृतार्थ शेगावकर, प्रा. संजिवनी भालसिंग, प्रा. उमेश गोगडीया यांची उपस्थिती होती.

प्राध्यापकांना प्रशिक्षण

कृतार्थ शेगावकर यांनी विद्यार्थ्यांच्या मानसिक आरोग्याचा अभ्यास करून भावनिक प्रथमोपचाराचे काम या क्लबच्या माध्यमातून केले जाणार आहे. त्यासाठी महाराष्ट्रातून जी सहा केंद्रे निवडली आहेत, त्यामध्ये या विद्यापीठाचा समावेश आहे. काही प्राध्यापकांना प्रशिक्षण देवून मानसरंग संवादक म्हणून तयार करण्यात आले आहे. त्यांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांचे समुपदेशन केले जाईल, अशी माहिती दिली.

Web Title: Study and treatment of students' mental health will be done in the university!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.