ईव्हीएम घोटाळ्याचे पुरावे लवकरच कोर्टात देणार - मदन शेळके यांची माहिती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 12, 2018 12:59 PM2018-08-12T12:59:03+5:302018-08-12T12:59:32+5:30

घोळ करण्यासाठीच नियमांना फाटा

Evidence of EVM scam will soon be made in court - Madan Shelke's information | ईव्हीएम घोटाळ्याचे पुरावे लवकरच कोर्टात देणार - मदन शेळके यांची माहिती

ईव्हीएम घोटाळ्याचे पुरावे लवकरच कोर्टात देणार - मदन शेळके यांची माहिती

Next
ठळक मुद्दे१० कोटींचा दावा दाखल करणारपराभूत उमेदवार व समर्थकांची प्रचंड गर्दी

जळगाव : मतदान यंत्रावर नियमानुसार मुळाक्षरांच्या क्रमवारीनुसार उमेदवारांची नावे घेणे गरजेचे आहे. परंतु केवळ घोळ करण्यासाठीच मनपा निवडणुकीत क्रमवारीनुसार नावे घेण्यात आली नाहीत. हा ईव्हीएम घोटाळ्याशी संबंधित एक मुद्दा असून जळगाव मनपा निवडणुकीतील ईव्हीएम घोटाळ्याचे आपल्याकडे अनेक पुरावे आहेत, ते आपण न्यायालयातच सादर करु, अशी माहिती अमरावती येथील सामाजिक कार्यकर्ते मदन शेळके यांनी पत्रपरिषदेत दिली.
शनिवारी दुपारी पत्रकार भवनात ही पत्रपरिषद झाली. यावेळी काँग्रेसचे महानगराध्यक्ष डॉ.अर्जुन भंगाळे, उल्हास साबळे, सामाजिक कार्यकर्ते शिवराम पाटील, अमोल कोल्हे यांची मुख्य उपस्थिती होती.
जळगाव, सांगली व अमरावतीच्या निवडणुकीबाबत आयोगाकडे तक्रार
सुमारे ५ महिन्यापूर्वी झालेल्या अमरावती येथील मनपा निवडणुकीतही इव्हीएम घोटाळा झाला असून याबाबत आपण निवडणूक आयोगाकडे ही निवडणूक रद्द करण्याची मागणी केली असल्याचे शेळके यांनी सांगितले.
आता सांगली आणि जळगावचीही तक्रार आपण केली आहे.
प्रभाग ८ आणि १८ मध्ये काही दिवसातच वाद उद्भवणार
प्रभाग ८ अ आणि १८ ड मध्ये काही दिवसातच वाद उद्भवणार, असेही भाकितही शेळके यांनी केले मात्र काय व कसा वाद उद्भवणार हे नेमकेपणाने त्यांनी सांगितले नाही.
दाखवले नाहीत पुरावे
मदन शेळके यांनी मनपा निवडणूक निकाल जाहीर झाल्यावर दुसऱ्याच दिवशी या निवडणुकीत इव्हीएम घोटाळा झाल्याचा आरोप करुन न्यायालयात जाण्याचा इशारा दिला होता. त्याबाबतची माहिती देण्यासाठी शनिवारी जळगावात आले होते. ते काय माहिती आणि पुरावे देतात हे जाणून घेण्यासाठी शहरातील बहुसंख्य पराभूत उमेदवार हे यावेळी उपस्थित होते मात्र निवडणूक घोटाळ्यासंबंधीचे पुरावे केवळ न्यायालयात सादर करु असे सांगत त्यांनी पत्रकारांनाही पुरावे दाखवले नाहीत.
१० कोटींचा दावा दाखल करणार
निवडणूक रद्द करण्यासाठी न्यायालयात जाणे आवश्यक असते. परंतु पैशांअभावी आपण अमरावती मनपा संबधी अद्यापही न्यायालयात जावू शकलो नाही, असे सांगत लवकरच अमरावती आणि जळगाव मनपा निवडणुकीतील घोटाळ्याबाबत न्याय मिळावा यासाठी न्यायालयात जाण्याची तयारी असून १० कोटींचा दावा संबंधित विजयी उमेदवार आणि अधिकाºयांविरुद्ध करणार असल्याचे शेळके यांनी सांगितले. याचबरोबर यापूर्वीच आपण अनेक चुकीच्यापद्धतीने निवडून आलेल्या जळगावातील उमेदवारांची यादी जाहीर केली होती, असेही त्यांनी यावेळी सांगितले.
बटन दाबल्यानुसार होत नाही मतदान...घोटाळा हा शासकीय अधिकाºयांना हाताशी धरुनच केला जातो. इव्हीएम मशीनवर मुळाक्षरांच्या क्रमाप्रमाणे (अल्फाबेटीकल) उमेदवारांची नावे नसले तरी अधिकाºयांच्या मशीनमध्ये ते मुळाक्षरांच्या क्रमाप्रमाणे असतात. उदाहरणार्थ मतदाराने २ नंबरवर असलेल्या झाडे नावाच्या उमेदवारास जर मत टाकले तर ते झाडे यांना मिळत नाही. कारण अधिकाºयाकडील यंत्रामध्ये अल्फाबेटीकल प्रमाण नावे असतात त्यात झाडे हे नाव शेवटी असते त्यामुळे हे मत झाडे यांना न मिळता अधिकाºयाच्या यंत्रानुसार २ क्रमांकावर जो उमेदवार असतो त्याला ते मतदान जाते. आणि हा घोळ करण्यासाठीच मतदान यंत्रावर (मतपत्रिकेवर) अल्फाबेटीकल प्रमाणे नावे टाळल्याचे शेळके यांनी यावेळी सांगितले.
पराभूत उमेदवार व समर्थकांची प्रचंड गर्दी
पत्रपरिषदेला पराभूत उमेदवार व त्यांचे समर्थकही आल्याने प्रचंड गर्दी झाली होती. मध्येच कोणीही प्रश्न विचारत असताना काहीवेय गोंधळही झाला. राष्टÑवादी काँग्रेसच्या पदाधिकारी मंगला पाटील यांनी भाजपाने सत्तेचा दुरुपयोग निवडणूक कालावधीत केल्याचा आरोप केला. पोलीस तक्रारींकडे दुर्लक्ष करीत होते असा आरोपही त्यांनी केला.
घोटाळा उघडकीय यावा यासाठी लढवली होती विधानसभा निवडणूक
इव्हीएम घोटाळा उघडकीस आणण्यासाठी आपण विधानसभा निवडणूक लढवली होती अशी माहितीही शेळके यांनी दिली. त्यावेळी मतदरांना मतदान चिठ्ठी शासकीय यंत्रणेकडून घरपोच मिळावी अशी मागणी आयोगाकडे केली होती. ती मागणी मान्य होवून आता अंमलबजावणी होवू लागल्याचेही त्यांनी सांगितले.
फडणीस आणि रावल घोटाळा करुन निवडून आले!
मुख्यमंत्री देंवद्र फडणवीस, मंत्री एकनाथ शिंदे, राजकुमार बडोले, जयकुमार रावल, विनोद तावडे, सुधीर मुनगट्टीवार आदी गेल्या विधानसभा निवडणुकीत घोटाळा करुन निवडून आले, असाही आरोप शेळके यांनी केला आहे. दरम्यान आपले कोणतेही आरोप खोटे असतील तर आपल्यावर गुन्हा दाखल करावा, असे आव्हानही त्यांनी दिले आहे.
निवडणूक आयोगाचे आव्हान का स्वीकारले नाही?
इव्हीएममध्ये घोटाळा होवू शकत असले तर तो सिद्ध करुन दाखवावा, असे आव्हान निवडणूक आयोगाने दिले होते. त्यावेळी आपण ते आव्हान का स्विकारले नाही, असे विचारले असता शेळके यांनी समाधानकारक उत्तर दिले नाही. मला पुढे काय घोटाळे होतात हे पहायचे होते, असे उत्तर त्यांनी दिले.
घोटाळा कसा करता येतो ते सांगा- कैलास सोनवणे
इव्हीएम घोटाळा कसा होतो हे जाणून घेण्यासाठी माजी नगरसेवक कैलास सोनवणे हे देखील उपस्थित होते. कसा घोटाळा करता येतो हे आम्हाला सांगा ... म्हणजे आम्हाला निवडणुकीत मेहनतच घेण्याची गरज पडणार नाही.. असेही ते उपहासाने म्हणाले परंतु शेळके त्यांना समाधानकारक उत्तर देवू शकले नाही.
अधिकारी बनले भाजपाचे कार्यकर्ते- शिवराम पाटील
डीवायएसपी सचिन सांगळे व इतर अधिकाºयांनी निवडणुकीत भाजपाचे काम केले. प्रभाग १६ मधील सेंट लॉरेन्स मतदान केंद्रावर झालेल्या वादाकडे त्यांनी दुर्लक्ष केले. मतदान केंद्रात शिरलेल्या गाडीचा नंबर बदलण्यात आला. एकीकडे सामान्य माणसावर फिर्यादीची वाट न पाहता गुन्हा दाखल केला जातो मात्र या ठिकाणी गुन्हा दाखल केला नाही. सहकार राज्यमंत्री गुलाबराव पाटील हे देखील या ठिकाणी येवून गेलेत मात्र त्यांनीही फिर्याद दिली नाही, असेही शिवराम पाटील यावेळी म्हणाले.

Web Title: Evidence of EVM scam will soon be made in court - Madan Shelke's information

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.