संविधानाची प्रत जाळणा-यांचा चाळीसगाव येथे निषेध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 12, 2018 12:37 PM2018-08-12T12:37:07+5:302018-08-12T12:40:28+5:30

पोलीस निरीक्षकांना दिले निवेदन

Burning of constitutional copy | संविधानाची प्रत जाळणा-यांचा चाळीसगाव येथे निषेध

संविधानाची प्रत जाळणा-यांचा चाळीसगाव येथे निषेध

Next
ठळक मुद्देसमाजकंटकांकडून विघ्नसंतोषी प्रवृत्तीचे दर्शन संबंधितांवर कठोर कारवाई करावी, अशा मागणीचे निवेदन

चाळीसगाव, जि. जळगाव : दिल्लीत जंतर मंतर येथे संविधानाची प्रत जाळून आक्षेपार्ह घोषणा देणा-या कथीत प्रवृत्तीचा रविवारी चाळीसगाव येथे निषेध करण्यात आला. संबंधितांवर कठोर कारवाई करावी, अशा मागणीचे निवेदनही यावेळी चाळीसगाव पोलीस ठाण्याचे निरीक्षक रामेश्वर गाढे पाटील यांना दिले. संविधान ही भारतीय लोकशाहीची अमीट ओळख असून लोकशाही प्रधान देश म्हणून जगात भारताने आपले नाव अधोरेखीत केले आहे.
संविधानाची प्रत जाळून काही समाजकंटकांनी आपल्या विघ्नसंतोषी प्रवृत्तीचे दर्शन घडविले आहे. अवमान सहन केला जाणार नाही. असे निवेदनात म्हटले आहे.
निवेदनावर दलित हक्क संघर्ष समितीचे धर्मभुषण बागुल, नगरसेवक रामचंद्र जाधव, अ‍ॅड. राहुल जाधव, माजी जि.प.सदस्य मंगेश राजपूत, शरद जाधव यांच्यासह शेकडो कार्यकर्त्यांच्या स्वाक्ष-या आहेत.

Web Title: Burning of constitutional copy

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.