धक्कादायक! कोरोनावरील या लसीमुळे होऊ शकतात साईड इफेक्ट्स, कंपनीने स्वत:च दिली कबुली    

By ऑनलाइन लोकमत | Published: April 30, 2024 07:58 AM2024-04-30T07:58:33+5:302024-04-30T07:59:16+5:30

Corona Vaccine Side Effects: चार वर्षांपूर्वी जगभरात कोरोना विषाणूने (Corona Virus) धुमाकूळ घातल्यानंतर कोरोनाच्या फैलावास पायबंद घालण्यासाठी व्यापक प्रमाणावर लसीकरण करण्यात आले होते. भारतातही अल्पावधीत कोट्यवधी लोकांना कोरोनाच्या लसीचे दोन डोस देण्यात आले होते. दरम्यान, कोरोनाची लस आणि तिच्यापासून होणाऱ्या अपायांबाबतही खूप चर्चा झाली होती.

Corona Vaccine Side Effects: Shocking! This vaccine on Corona can cause side effects, the company itself admitted | धक्कादायक! कोरोनावरील या लसीमुळे होऊ शकतात साईड इफेक्ट्स, कंपनीने स्वत:च दिली कबुली    

धक्कादायक! कोरोनावरील या लसीमुळे होऊ शकतात साईड इफेक्ट्स, कंपनीने स्वत:च दिली कबुली    

चार वर्षांपूर्वी जगभरात कोरोना विषाणूने धुमाकूळ घातल्यानंतर कोरोनाच्या फैलावास पायबंद घालण्यासाठी व्यापक प्रमाणावर लसीकरण करण्यात आले होते. भारतातही अल्पावधीत कोट्यवधी लोकांना कोरोनाच्या लसीचे दोन डोस देण्यात आले होते. दरम्यान, कोरोनाची लस आणि तिच्यापासून होणाऱ्या अपायांबाबतही खूप चर्चा झाली होती. आता ऑक्सफर्ड-एस्ट्राजेनेका कोरोना लसीबाबत एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. ही लस तयार करणाऱ्या एस्ट्राजेनेका कंपनीने युनायटेड किंग्डमच्या उच्च न्याालयामध्ये काही कागदपत्रं दिली असून, त्यामधून या कंपनीने त्यांच्या कोविड-१९ लसीमधून टीटीएससारखा दुर्मीळ आजार होऊ शकतो, असा दावा केला आहे. एस्ट्राजेनेका लसीची अनेक देशांमध्ये कोविशिल्ड आणि वॅक्सजेवरिया या नावांनी विक्री करण्यात आली होती.

थ्रोम्बोसायटोपेनिया सिंड्रोम (अर्थात टीटीएस) शरीरामध्ये रक्ताच्या गुठळ्या तयार होण्यास कारणीभूत ठरतो. त्यामुळे एखाद्या व्यक्तीला ब्रेन स्ट्रोक, कार्डियक अरेस्ट होण्याची शक्यता वाढते. त्याशिवाय हा सिंड्रोम शरिरामध्ये बॉडी प्लेटलेट्सचं प्रमाण कमी होण्यासही कारणीभूत ठरतो.

एस्ट्राजेनेका कंपनीला सध्या क्लास अॅक्शन खटल्याचा सामना करावा लागत आहे. हा खटला जेमी स्कॉट नावाच्या एका व्यक्तीने दाखल केला आहे. ऑक्सफर्ड विद्यापीठासोबत मिळून तयार करण्यात आलेली एस्ट्राजेनेकाची लस घेतल्यानंतर जेमी स्कॉट हे ब्रेन डॅमेजची शिकार झाले होते. त्याशिवाय इतरही काही कुटुंबांनी अशा शारीरिक तक्रारींचा सामना करावा लागत असल्याचे सांगत त्याविरोधात कोर्टात धाव घेतली होती. आता या कुटुंबांकडून लसीमुळे झालेल्या त्रासाची भरपाई म्हणून नुकसान भरपाईती मागणी करण्यात येत आहे.

आता सुरक्षेच्या दृष्टीकोनातून एस्ट्राजेनेका-ऑक्सफर्डची लस युनायटेड किंग्डममध्ये दिली जात नाही. तसेच या कंपनीनेही या लसीमुळे होणाऱ्या दुर्मिळ अपायांची बाब मान्य केली आहे. त्यामुळे याने बाधित झालेल्या व्यक्ती आणि कुटुंबांकडून नुकसान भरपाईची मागणी केली जात आहे. मात्र लसीमुळे होणाऱ्या अपायांची बाब मान्य केल्यानंतरही कंपनीने यामुळे होणारे आजार आणि अपायांचे दावे फेटाळून लावले आहेत. 

Web Title: Corona Vaccine Side Effects: Shocking! This vaccine on Corona can cause side effects, the company itself admitted

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.