उन्हाळ्यात शरीराला ठंडा-ठंडा कूल कूल ठेवणाऱ्या जडीबुटी, दिवसभर तुम्हाला वाटेल फ्रेश!

By ऑनलाइन लोकमत | Published: May 2, 2024 10:22 AM2024-05-02T10:22:11+5:302024-05-02T10:22:41+5:30

आज आम्ही तुम्हाला काही अशा जडीबुटींबाबत सांगणार आहोत ज्यामुळे तुमचं शरीर दिवसभर थंड राहील आणि अनेक आजारांपासून तुमचा बचावही होईल.

These Ayurvedic herbs will keep your body cool in summer | उन्हाळ्यात शरीराला ठंडा-ठंडा कूल कूल ठेवणाऱ्या जडीबुटी, दिवसभर तुम्हाला वाटेल फ्रेश!

उन्हाळ्यात शरीराला ठंडा-ठंडा कूल कूल ठेवणाऱ्या जडीबुटी, दिवसभर तुम्हाला वाटेल फ्रेश!

उन्हाळ्यात आरोग्यासंबंधी वेगवेगळ्या समस्यांपासून शरीराचा बचाव करणं एक मोठं चॅलेंज असतं. तुमची एक छोटी चूक कधी मोठी होईल काहीच सांगता येत नाही. अशात आरोग्याची काळजी घेणं फार महत्वाचं ठरतं. खासकरून या दिवसात शरीर थंड ठेवण्यावर फोकस करावा लागतो. कारण हीट स्ट्रोकमुळे तुम्हाला फटका बसू शकतो. जर तुम्ही कामाच्या व्यापात स्वत:कडे लक्ष देऊ शकत असाल तर आज आम्ही तुम्हाला काही अशा जडीबुटींबाबत सांगणार आहोत ज्यामुळे तुमचं शरीर दिवसभर थंड राहील आणि अनेक आजारांपासून तुमचा बचावही होईल.

1) तुळशी

तुळशीचे आरोग्यदायी गुण तुम्हाला माहीत असतीलच. तुळशीला आयुर्वेदात फार महत्व आहे. आपल्या वेगवेगळ्या गुणांसाठी ओळखली जाणारी तुळस शरीर थंड ठेवण्याचंही काम करते. तुळशीची काही पाने चहात टाकून किंवा या पानांचा एक चमचा रस मधात टाकूनही सेवन करू शकता. याने तुमचं शरीर दिवसभर थंड राहील. तसेच याने तुमचा मेंदुही फ्रेश होईल. सकाळच्या वेळी तुम्ही तुळशीचं सेवन करू शकता.

2) आवळे

आवळ्यांमध्ये वेगवेगळे गुण आढळतात. यात भरपूर व्हिटॅमिन सी आणि अॅंटी-ऑक्सिडेंट्स असतात. उन्हाळ्यात याच्या सेवनाने तुम्हाला खूप फायदे होऊ शकतात. आवळ्यामुळे तुमची इम्यूनिटी तर वाढेलच सोबतच शरीराचं तापमानही कमी होईल. याचा तुम्ही नियमितपणे आहारात समावेश केला तर तुम्हाला खूप फायदा होईल. तुम्ही आवळे तसेही खाऊ शकता किंवा यांचा ज्यूसही पिऊ शकता. तसेच याच्या पावडरचं सेवनही करू शकता. 

3) अ‍ॅलोवेरा

अ‍ॅलोवेरा एक फार महत्वाची जडीबुडी मानली जाते. अ‍ॅलोवेरामध्ये असे गुण असतात जे तुमची इम्युनिटी वाढवतात आणि शरीर थंड ठेवतात. तुम्ही ताजा अ‍ॅलोवेराच्या जेलचं सेवन करू शकता. तसेच अ‍ॅलोवेरा ज्यूसचं सेवनही करू शकता. याने तुम्हाला फ्रेशनेस मिळेल. उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये उन्हामुळे त्वचा खराब होण्याचा धोका जास्त असतो. अशात अ‍ॅलोवेरा तुमच्यासाठी फायदेशीर ठरू शकतो. चेहऱ्यावर याचा जेल लावल्याने त्वचा चांगली होईल. याने चेहऱ्याला थंडावाही मिळेल. 

4) आले

आले सुद्धा ही एक महत्वाची जडीबुटी आहे. आल्याचे आरोग्याला अनेक फायदे होतात. याने हिवाळ्यात शरीराचा इन्फेक्शनपासून  बचाव होतो आणि शरीराला उष्णताही मिळते. तेच उन्हाळ्यात याने शरीरातील घाम बाहेर निघतो आणि शरीराचं तापमान कमी होतं. अशात तुम्ही या दिवसांमध्ये लिंबाच्या रसांमध्ये आल्याचा रस टाकून पिऊ शकता. याने तुम्हाला खूप आराम मिळेल.

Web Title: These Ayurvedic herbs will keep your body cool in summer

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.