हाय ब्लड शुगर कंट्रोल करण्यासाठी रोज प्या हे खास पाणी, जाणून घ्या कसं कराल तयार

By ऑनलाइन लोकमत | Published: April 20, 2024 10:05 AM2024-04-20T10:05:16+5:302024-04-20T10:06:01+5:30

तुम्हाला जर हा आजार कंट्रोलमध्ये ठेवायचा असेल तर रोज सकाळी एक छोटसं काम करावं लागेल. तुम्हाला काही दाण्यांचं पाणी प्यावं लागेल.

Benefits of chickpeas water in morning to remove high blood sugar and diabetes | हाय ब्लड शुगर कंट्रोल करण्यासाठी रोज प्या हे खास पाणी, जाणून घ्या कसं कराल तयार

हाय ब्लड शुगर कंट्रोल करण्यासाठी रोज प्या हे खास पाणी, जाणून घ्या कसं कराल तयार

डायबिटीस हा एक असा आजार आहे जो कधीच बरा होत नाही. त्याला केवळ कंट्रोल केलं जाऊ शकतं. हा आजार एक मेटाबॉलिक डिसऑर्डर आहे जो कंट्रोल करण्यासाठी मेटाबॉलिक प्रोसेस सुधारावी लागते. तुम्हाला जर हा आजार कंट्रोलमध्ये ठेवायचा असेल तर रोज सकाळी एक छोटसं काम करावं लागेल. तुम्हाला काही दाण्यांचं पाणी प्यावं लागेल.

डायबिटीसमध्ये खाण्या-पिण्यावर लक्ष न दिल्याने शुगर वाढते. हळूहळू रात्री लघवी येणे, तहान लागणे, वजन कमी होणे, थोड्या थोड्या वेळाने भूक लागणे, धुसर दिसणे, हात-पाय सुन्न होमे, जखम लवकर न भरणे इत्यादी लक्षणं गंभीर होऊ लागतात. जर तुम्हाला या समस्यांपासून बचाव करायचा असेल तर हा एक घरगुती उपाय नक्की करा.

पाण्यात भिजवा दाणे

रात्री 3 ते 4 चमचे काळे-पांढरे चणे पाण्याने धुवा

ते एका वाटीत पाण्यात टाकून ठेवा

सकाळी हे दाणे खावेत

नंतर पाणी गाळून प्यावे.

तुम्ही चणे उकडूनही पाणी बनवू शकता

औषध न घेता कमी राहील ब्लड शुगर

जास्तीत जास्त रूग्णांना ब्लड शुगर कंट्रोलमध्ये ठेवण्यासाठी औषधं खावी लागतात. तेच तुम्ही ही औषधं टाळू शकता. एका शोधात सांगण्यात आले की, चणे खाल्ल्याने इन्सुलिन सीक्रेशन वाढतं. याने हॉर्मोन ब्लड शुगर कंट्रोल करण्याचं काम होतं. 

चण्याचं पाणी आहे औषध

चणे पाण्यात भिजवून खाल्ल्याने सहजपणे पचन होतात. यातील कंपाउंड अॅक्टिव होतात आणि लवकर असर दाखवतात. चण्याच्या पाण्यातही अॅंटी डायबिटीक तत्व येतात जे शुगरच्या रूग्णांसाठी फायदेशीर ठरू शकतं.

फायबर

चण्यांमध्ये भरपूर फायबर असतं. याच्या सेवनाने पचनाचा वेग कमी होतो. ज्यामुळे ब्लड शुगर अचानक वाढत नाही आणि डायबिटीसमध्ये एक निवांत जीवन जगू शकता. फायबरमुळे वजन कंट्रोल करण्यास मदत मिळते जे डायबिटीसचं एक मुख्य कारण आहे.

प्रोटीन

शुगरच्या रूग्णांचं अचानक वजन वाढू लागतं. ग्लूकोज मिळत नसल्याने शरीर मांसपेशी खाऊ लागतं. चणे खाऊन तुम्हाला प्रोटीन मिळतं जे मसल्स लॉसपासून बचाव करतं. शरीर मजबूत आणि फिट ठेवण्यासाठी प्रोटीन फार महत्वाचं आहे.

Web Title: Benefits of chickpeas water in morning to remove high blood sugar and diabetes

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.