वेगवेगळ्या उपचारांसाठी केला जातो 'या' पानांचा वापर, याच्या रसाने अनेक आजार होतील दूर

By ऑनलाइन लोकमत | Published: April 19, 2024 03:56 PM2024-04-19T15:56:09+5:302024-04-19T15:56:36+5:30

या पानांना आयुर्वेदातही फार महत्व आहे. एका रिसर्चमधून समोर आलं आहे की, या पानांमध्ये असे अनेक तत्व असतात जे शरीराला आजारांपासून वाचवण्यासाठी फायदेशीर ठरतात.

Amazing health benefits of papaya leaves you should know | वेगवेगळ्या उपचारांसाठी केला जातो 'या' पानांचा वापर, याच्या रसाने अनेक आजार होतील दूर

वेगवेगळ्या उपचारांसाठी केला जातो 'या' पानांचा वापर, याच्या रसाने अनेक आजार होतील दूर

Papaya Leaves Benefits : पपई खाणं आरोग्यासाठी किती फायदेशीर असतं हे सगळ्यांनाच माहीत आहे. पपईमध्ये अनेक पोषक तत्व असतात. जे आपलं डायजेस्टिव सिस्टीम चांगलं ठेवतात. कच्ची किंवा पिकलेली पपई खाण्याचे आरोग्याला अनेक फायदे मिळतात. पण अनेकांना हे माहीत नसतं की, केवळ पपईचं नाही तर पपई झाडाच्या पानांचे देखील अनेक फायदे आहेत. याचा ज्यूस काढून प्यायल्याने शरीराला संजीवनी मिळते. त्यामुळेच या पानांना आयुर्वेदातही फार महत्व आहे. एका रिसर्चमधून समोर आलं आहे की, या पानांमध्ये असे अनेक तत्व असतात जे शरीराला आजारांपासून वाचवण्यासाठी फायदेशीर ठरतात.

नॅशनल सेंटर फॉर बायोटेक्नोलॉजी इन्फॉर्मेशनच्या रिपोर्टनुसार, आशियाई देसांमध्ये अनेक आजारांच्या उपचारासाठी पपईच्या पानांचा वापर फार आधीपासून केल जातो. आयुर्वेदिक चिकित्सेतही यांचा अनेक गोष्टींसाठी वापर केला जातो.

पपईच्या पानांबाबत आतापर्यंत अनेक रिसर्च समोर आले आहेत, ज्यात ही पाने अ‍ॅंटी-डेंग्यू, अ‍ॅंटी-डायबिटीक, न्यूरोप्रोटेक्टिव आणि अ‍ॅंटीइंफ्लेमेटरी तत्वांनी भरपूर असतात. पपईच्या पानांचा रस आयुर्वेदिक डॉक्टरांच्या सल्ल्याने प्यावा. कारण अनेक रिसर्चमध्ये आढळून आलं आहे की, पपई पानांचा अर्क शरीरातील काही अवयवांसाठी घातक ठरू शकतो. त्यामुळे यांचं सेवन एक्सपर्टच्या सल्ल्यानेच करावं.

मलेरिया आणि डेंग्यूचा ताप घालवण्यासाठी एक्सपर्ट पपईची पाने उकडून त्यांचं सेवन करण्यास सांगतात. असं मानलं जातं की, पपईच्या पानांचा अर्क ताप असलेल्या रूग्णांमध्ये प्लेटलेट्स काउंट आणि व्हाइट व रेड ब्लड सेल्स वाढवतो. पपईच्या पानांमध्ये 50 पेक्षा जास्त तत्वांचे घटक आढळले आहेत. त्यामुळेच वेगवेगळ्या उपचारांमध्ये यांचा वापर केला जातो. वैज्ञानिक अभ्यासातून समजलं की, पपईच्या पानांमध्ये ग्लाइकोसाइड्स, फ्लेवोनोइड्स एल्कलॉइड्स, सॅपोनिन्स, फेनोलिक तत्व, अमीनो अ‍ॅसिड, लिपिड, कार्बोहायड्रेट, एंजाइम, व्हिटॅमिन आणि खनिज भरपूर असतात.

Web Title: Amazing health benefits of papaya leaves you should know

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.