भारतीय राज्यघटना मान्य नाही, त्यांनी पोर्तुगालला जावे; सदानंद शेट तानावडेंनी ठणकावले

By किशोर कुबल | Published: April 24, 2024 03:27 PM2024-04-24T15:27:56+5:302024-04-24T15:28:32+5:30

Lok Sabha Election 2024 : तानावडे  म्हणाले की विरियातोंनी याआधीही अशीच देशविरोधी वादग्रस्त विधाने व कृत्ये केलेली आहेत.

Indian constitution not acceptable, they should go to Portugal; Sadanand Shet Tanawade was beaten | भारतीय राज्यघटना मान्य नाही, त्यांनी पोर्तुगालला जावे; सदानंद शेट तानावडेंनी ठणकावले

भारतीय राज्यघटना मान्य नाही, त्यांनी पोर्तुगालला जावे; सदानंद शेट तानावडेंनी ठणकावले

पणजी : भारतीय घटना मान्य नाही त्यांनी पोर्तुगालला जावे, असे भाजप प्रदेशाध्यक्ष सदानंद शेट तानावडे यांनी ठणकावले. इंडिया आघाडीचे दक्षिण गोवा लोकसभा मतदारसंघातील उमेदवार विरियातो फर्नांडिस यांच्या घटनेचा अनादर करणाऱ्या विधानाचा तानावडे यांनी समाचार घेतला. विरियातो  यांच्या विधानाची व्हिडिओ क्लिप त्यांनी पत्रकारांना दाखवली. तानावडे  म्हणाले की विरियातोंनी याआधीही अशीच देशविरोधी वादग्रस्त विधाने व कृत्ये केलेली आहेत.

राष्ट्रीय नेते राहुल गांधी यांनी जनतेसमोर येऊन सांगावे की विरियातो यांना हे विधान करण्यास त्यांनी मान्यता दिली होती का? विरियातो यांनी भारतीय राज्यघटनेबाबत वादग्रस्त विधान करून बाबासाहेब आंबेडकर, पंडित जवाहरलाल नेहरू यांचाच नव्हे तर ज्या स्वातंत्र्य सैनिकांनी गोव्याच्या मुक्तीसाठी आपली आहुती दिली त्यांचा अपमान केलेला आहे, असे तानावडे म्हणाले. 

१५ ऑगस्ट रोजी स्वातंत्र्यदिनी सेंट जासिंतो बेटावर तिरंगा फडकवण्यास विरियातो यांनी विरोध केला होता. धार्मिक फूट पडणारी विधाने ते वेळोवेळी करीत असतात. छत्रपती शिवाजी महाराजांच्या बाबतीत फादर बोलमॉक्स  यांनी केलेला आक्षेपार्ह विधानाचे त्यांनी समर्थन केले होते. भारतीय घटना ज्यांना मान्य नाही त्यांनी पोर्तुगालला जावे. एकीकडे लोकशाहीवर विश्वास ठेवून शपथेवर उमेदवारी अर्ज भरायचा आणि दुसरीकडे घटनेचा अनादर करायचा अशी दुटप्पी भूमिका ते घेत आहेत त्यांची ही वसाहतवादी मानसिकता संताप जनक आहे, असे तानावडे म्हणाले. पत्रकार परिषदेस आमदार संकल्प आमोणकर व आमदार दाजी साळकर हेही उपस्थित होते.

Web Title: Indian constitution not acceptable, they should go to Portugal; Sadanand Shet Tanawade was beaten

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.