शहरं
Join us  
Trending Stories
1
मौनी खासदाराचं कौतुक करणं मनसे प्रमुखांची मजबुरी, संजय राऊतांचा राज ठाकरेंवर निशाणा
2
४ जूननंतर अजित पवार मिशी काढून फिरतील; आव्हानावर श्रीनिवास पवारांचे जोरदार प्रत्त्यूत्तर
3
'कसाब नाही, हेमंत करकरेंवर पोलिसांनी गोळ्या घाडल्या', विजय वडेट्टीवारांचा खळबळजनक दावा
4
'राणेंचा प्रचार करायला लागतोय यातच राज ठाकरेंचा विजय'; काँग्रेस नेत्याची बोचरी टीका
5
PHOTOS: अभिनेत्रींना मात देणारी 'अधिकारी'! राजकारणात आवड, चित्रपटांची ऑफर पण...
6
बजरंग पूनियावर NADAची मोठी कारवाई, पॅरिस ऑलिम्पिकमध्ये खेळण्याचं स्वप्न भंगणार?
7
“छत्रपती शिवरायांचा अनादर करणारा नेता नको”; पीयूष गोयल यांची राहुल गांधींवर टीका
8
ऑस्ट्रेलियातील महिला खासदाराचा लैंगिक छळ; पोस्ट करत मांडली व्यथा, म्हणाल्या...
9
राहुल गांधी, सिद्धरामय्या यांच्या ॲनिमेटेड व्हिडिओवरून वाद; जेपी नड्डा, अमित मालवीय यांच्याविरोधात काँग्रेसची तक्रार
10
“सांगलीत विशाल पाटलांवर अन्याय झाला, काँग्रेसच्या...”; विजय वडेट्टीवार स्पष्टच बोलले
11
'राजकारणातील कुठलीही ताकद...'; अमेठीतून तिकीट न मिळाल्याने रॉबर्ट वाड्रांची भावनिक पोस्ट
12
निज्जर हत्येप्रकरणी ३ भारतीयांना झालेल्या अटकेबाबत भारताची पहिली प्रतिक्रिया, जयशंकर म्हणाले...
13
"मुलांशी बोलू नकोस", भावाचा सल्ला अन् बहीण संतापली; १४ वर्षीय तरूणीने केली हत्या
14
अभिनेते क्षितीज झारापकर यांचे निधन, ५४व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
15
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना लाभ, व्यापाऱ्यांवर लक्ष्मीकृपा; बचत वाढेल, इच्छा पूर्ण होतील
16
करिअरच्या उच्च शिखरावर असताना सोडलं बॉलिवूड; लारा दत्ता म्हणाली, 'वाढत्या वयासोबत...'
17
नुपूर शर्मा, टी राजा यांच्यासह हिंदू नेत्यांच्या हत्येचा कट रचणाऱ्या मौलवीला अटक; १ कोटींची सुपारी अन् पाककडून शस्त्रे 
18
'तेजस्वी सूर्या गुंडगिरी करतात, मासे खातात'; काँग्रेसवर टीका करताना कंगनाने भाजप नेत्याला केलं लक्ष!
19
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज अयोध्येला जाणार, रामललाचे दर्शन घेणार, रोड शो करणार!
20
भाजपा उमेदवाराच्या विरोधात आंदोलनादरम्यान शेतकऱ्याचा मृत्यू, पोलिसांनी धक्का दिल्याचा आरोप

पुणे कराराचा बाबासाहेबांनीच केला होता धिक्कार

By admin | Published: September 25, 2015 2:01 AM

महात्मा गांधी व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यामध्ये १९३२ साली पुणे करार झाला होता.

जाहीर व्याख्यान : सुरेश माने यांचे प्रतिपादनगडचिरोली : महात्मा गांधी व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यामध्ये १९३२ साली पुणे करार झाला होता. या करारावर स्वाक्षरी करण्याचे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची मुळीच इच्छा नव्हती. मात्र देशातील बदललेली परिस्थिती लक्षात घेऊन नाईलाजास्तव या करारावर स्वाक्षरी करावी लागली. याचे परिणाम दिसून आल्यानंतर १९४२ साली डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी स्वत:च या कराराचा धि:क्कार केला होता, असे प्रतिपादन ज्येष्ठ विचारवंत अ‍ॅड. डॉ. सुरेश माने यांनी केले. बहुजन रिपब्लिकन आंबेडकर राईट्स सोशल मुव्हमेंटद्वारा गडचिरोली येथे गुरूवारी पुणे करार धिक्कार दिनानिमित्त ‘पेसा कायदा समज आणि गैरसमज, पुणे करार व आरक्षण’ या विषयावर जाहीर व्याख्यानाचे आयोजन गुरूवारी करण्यात आले होते. या प्रसंगी मार्गदर्शन करताना अ‍ॅड. सुरेश माने बोलत होते. यावेळी अखिल भारतीय आदिवासी विकास परिषदेचे प्रदेशाध्यक्ष दशरथ मडावी, सिद्धार्थ पाटील, महेश राऊत, आदिवासी विद्यार्थी संघाचे सरसेनापती नंदू नरोटे, संभाजी ब्रिगेडचे गणेश बावनवाडे, प्रा. संजय मगर, राजीव झोडे आदी मान्यवर उपस्थित होते. पुढे मार्गदर्शन करताना अ‍ॅड. डॉ. सुरेश माने म्हणाले की, गोलमेज परिषदेत ठरल्यानुसार इंग्रज सरकारने दलितांना स्वतंत्र मतदार संघ देण्याची तरतूद करण्यात आली होती. मात्र याला महात्मा गांधींनी विरोध करून येरवाडा तुरूंगात उपोषण सुरू केले व स्वतंत्र मतदार संघाच्या मागणीस विरोध केला. या कालावधीत देशात अशांतता निर्माण झाली होती. ही बाब लक्षात घेऊन डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी पुणे करार करून स्वतंत्र मतदार संघाची मागणी मागे घेतली. मात्र या करारावरील स्वाक्षरीबाबत डॉ. बाबासाहेब स्वत: असमाधानी होते. १९४२ मध्ये त्यांनी स्वत: या कराराचा धिक्कार केला. ‘स्टेट आॅफ मायनॉरिटी’ या ग्रंथातसुद्धा पुणे कराराबाबत नाराजी व्यक्त केली आहे. रिपब्लिकन पक्षातर्फेही यापूर्वी अनेक धिक्कार सभा घेण्यात आल्या आहेत. त्यामुळे केवळ बाबासाहेबांनी पुणे करारावर स्वाक्षरी केली. म्हणून त्याचा उदोउदो करणे हा मोेठा गैरसमज असल्याचे प्रतिपादन केले. सिद्धार्थ पाटील यांनी मार्गदर्शन करताना म्हणाले की, राजकीय आरक्षण १० वर्षासाठी दिले होते. त्याची मुदत वाढविली जात आहे. शैक्षणिक व नोकऱ्यांच्या आरक्षणाला कोणीच धक्का लावू शकत नाही. त्याबाबतची नोंद राज्यघटनेत करण्यात आली असल्याचे प्रतिपादन केले. पेसा कायद्याबाबत मार्गदर्शन करताना महेश राऊत यांनी केवळ राजकीय पोळी भाजून घेण्यासाठी पेसा कायद्याचा आधार घेऊन आदिवासी व गैरआदिवासी यांच्यामध्ये भांडण लावले जात असल्याचे प्रतिपादन केले. प्रास्ताविक डॉ. कैलाश नगराळे, संचालन रितेश अंबादे तर आभार राज बन्सोड यांनी मानले. या कार्यक्रमाला मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते. (नगर प्रतिनिधी)