आलापल्लीच्या मेळाव्यातून ८२ तरुणांना मिळाले सुरक्षा रक्षकाचे काम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 26, 2021 04:50 AM2021-02-26T04:50:13+5:302021-02-26T04:50:13+5:30

धर्मराव शिक्षण संस्थेचे अध्यक्ष अम्ब्रीशराव आत्राम यांच्या मार्गदर्शनात भरती मेळावा घेण्यात आला. या मेळाव्यासाठी आलापल्ली परिसरातील तरुण व महाविद्यालयाचे ...

82 youths got job as security guards from Alapally fair | आलापल्लीच्या मेळाव्यातून ८२ तरुणांना मिळाले सुरक्षा रक्षकाचे काम

आलापल्लीच्या मेळाव्यातून ८२ तरुणांना मिळाले सुरक्षा रक्षकाचे काम

Next

धर्मराव शिक्षण संस्थेचे अध्यक्ष अम्ब्रीशराव आत्राम यांच्या मार्गदर्शनात भरती मेळावा घेण्यात आला. या मेळाव्यासाठी आलापल्ली परिसरातील तरुण व महाविद्यालयाचे माजी विद्यार्थी उपस्थित होते. उपस्थित तरुणांची शारीरिक क्षमता चाचणी घेतल्यानंतर निवड झालेल्या उमेदवारांना आदेश वितरण समारंभ प्राचार्य डॉ. मारोती टिपले यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आला. यावेळी प्रा. पी.एन. घोडमारे, प्रा.रवी ढवळे, ओमप्रकाश चुनारकर, भरती अधिकारी अपूर्वा राॅय, नितेश बेहरे उपस्थित होते. अपूर्वा राॅय यांनी उपस्थित तरुणांना भरती प्रक्रिया व कंपनीचे नियम आणि फायदे समजावून सांगितले. प्राचार्य डॉ. एम.यू.टिपले म्हणाले, सुरक्षा रक्षकाच्या नाेकरीतून मिळणाऱ्या वेतनातून व वेळेतून स्पर्धा परीक्षेची तयारी युवकांनी करावाी. याप्रसंगी पात्र ठरलेल्या ८२ तरूणांना आदेश देण्यात आले. तर ११ तरूणांचे वय २१ वर्षांपेक्षा कमी भरल्याने त्यांना प्रतीक्षा यादीत ठेवण्यात आले. वयाची २१ वर्षे पूर्ण होताच कंपनी कार्यालयात रूजू होण्याचा सल्ला भरती अधिकारी अपूर्वा राॅय यांनी दिला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक, सूत्रसंचालन आणि आभार स्पर्धा परीक्षा संचालक डॉ.आर‌.डब्ल्यू. सूर यांनी केले. भरती मेळावा यशस्वी करण्यासाठी महाविद्यालयातील कर्मचाऱ्यांनी सहकार्य केले.

Web Title: 82 youths got job as security guards from Alapally fair

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.