आदित्यने 'करून दाखवलं'! दहावीत 'ती'च्या प्रेमात पडला, ब्रेकअपमुळे कोलमडला; पण 'रिस्टार्ट' करत IAS झाला

By ऑनलाइन लोकमत | Published: May 10, 2024 09:23 AM2024-05-10T09:23:49+5:302024-05-10T09:30:08+5:30

बारावीची परीक्षा उत्तीर्ण झाल्यावर वडिलांच्या आग्रहामुळे आदित्यने अभियांत्रिकी विभागात प्रवेश घेतला....

UPSC Result 2023: Resolute after breakup and became IAS Aditya Pandey upsc success story | आदित्यने 'करून दाखवलं'! दहावीत 'ती'च्या प्रेमात पडला, ब्रेकअपमुळे कोलमडला; पण 'रिस्टार्ट' करत IAS झाला

आदित्यने 'करून दाखवलं'! दहावीत 'ती'च्या प्रेमात पडला, ब्रेकअपमुळे कोलमडला; पण 'रिस्टार्ट' करत IAS झाला

UPSC Success Story: एखाद्या चित्रपटाच्या पटकथेप्रमाणे आदित्यच्या आयुष्यात घडामोडी घडत गेल्या. प्रेमात झालेली फसवणूक, परीक्षांतील अपयश आणि मानसिक तणाव अशा अडचणींवर मात करत अखेर त्याने यशाला गवसणी घातलीच. प्रेमात प्रेयसी दिलेला शब्द न पाळता सोडून गेली. त्यानंतर आलेल्या एकटेपणावर मात करत आदित्यने यूपीएससीची तयारी सुरू केली आणि तिसऱ्या प्रयत्नात तो IAS झाला. 

बिहारची राजधानी असणाऱ्या पाटणामधील आदित्य पांडेने (IAS Aditya Pandey) यूपीएससीच्या परीक्षेत यश मिळवले आहे. या परीक्षेत त्याने ४८ वी रँक मिळवली आहे. तसेच काही वर्षांपूर्वी त्याचे ब्रेकअप झाले होते त्यावेळी त्यानी सांगितलेला शब्दही खरा करून दाखवला. इंजिनीअरिंग आणि एमबीएनंतर आदित्यने यूपीएससीची परीक्षा दिली. तो दोन वेळा अयशस्वी ठरला, पण तिसऱ्या प्रयत्नांत त्याने करून दाखवलं.

घरातील भावडांमध्ये आदित्य सर्वात छोटा आहे. त्याला तीन बहिणी आणि एक भाऊ आहे. पाटणा येथे प्राथमिक शिक्षण पूर्ण केल्यानंतर तो जामनगरला गेला. आदित्यने इयत्ता ८ वी आणि ९ वी मध्ये चांगली कामगिरी केली होती, परंतु १० वी मध्ये तो एका मुलीच्या प्रेमात पडला. प्रेम फुलत असतानाच मुलीने त्याला नाकारले. त्यावेळी या प्रकरणात वेळ गेला आणि आदित्यला दहावीत कमी गुण मिळाले. त्यामुळे त्याच्या वडिलांनी त्याला पाटण्याला परत पाठवले होते.

UPSC परीक्षेबद्दल माहिती नव्हती -

बारावीची परीक्षा उत्तीर्ण झाल्यावर वडिलांच्या आग्रहामुळे आदित्यने अभियांत्रिकी विभागात प्रवेश घेतला. आदित्यला अभियांत्रिकीमध्ये विशेष रुची नसूनही त्याने अभ्यास करून चांगले गुण प्राप्त केले होते. पण बालपणीच्या मैत्रिणीसोबत ब्रेकअप झाल्याने तो खूप दु:खी झाला होता. त्या मानसिक तणावातून बाहेर पडायला त्याला अनेक वर्षे गेली. कॉलेजमध्ये असताना सिनियरकडून UPSC बद्दल थोडे ऐकले होते, परंतु या परीक्षेबद्दल त्याला पूर्ण माहिती नव्हती.

देशात ४८ वी रँक -

२०२१ आणि २०२२ मधील UPSC परीक्षेत आलेल्या अपयशामुळे आदित्य खचला होता. सलग दोन वर्षे निराशा त्याच्या पदरी आली होती. या परीक्षेची तयारी करताना त्याला अनेक अडचणीवर मात करावी लागली. अभ्यासाचे योग्य नियोजन आणि तणावापासून दूर राहण्यासाठी त्याने वारंवार प्रयत्न केले. सततच्या अपयशामुळे त्याच्यातील आत्मविश्वास कमी होऊ लागला.

आजूबाजूच्या लोकांच्या नकारात्मक बोलण्याचाही त्याच्यावर प्रभाव पडला. आदित्यने लोकांच्या म्हणण्याकडे दुर्लक्ष केले आणि कोणताही बॅकअप प्लॅन न करता जोमाने तयारी सुरू केली. २०२३ साली त्याने यश मिळवले आणि परीक्षेत ४८ वी रँक मिळवली. आदित्यने यूपीएससीतील ऑप्शनल विषयासाठीच कोचिंगची मदत घेतली होती. बाकी त्याने स्वत:च्या अभ्यासावर लक्ष केंद्रित करून परीक्षेत यश मिळविले.

Web Title: UPSC Result 2023: Resolute after breakup and became IAS Aditya Pandey upsc success story

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.