नीट-पीजीची परीक्षा आता विभागनिहाय; ऐन वेळी रचनेत बदल करण्याच्या निर्णयामुळे विद्यार्थी नाराज

By ऑनलाइन लोकमत | Published: May 6, 2024 06:08 AM2024-05-06T06:08:16+5:302024-05-06T06:08:33+5:30

दी नॅशनल बोर्ड ऑफ एक्झामिनेशन्सने (एनबीए) याबाबत माहिती देताना आता परीक्षा दोन वेगळ्या भागात विभाजित करण्यात येत असल्याचे जाहीर केले आहे

NEET-PG exam now department wise; Students are upset with the decision to change the structure at the same time | नीट-पीजीची परीक्षा आता विभागनिहाय; ऐन वेळी रचनेत बदल करण्याच्या निर्णयामुळे विद्यार्थी नाराज

नीट-पीजीची परीक्षा आता विभागनिहाय; ऐन वेळी रचनेत बदल करण्याच्या निर्णयामुळे विद्यार्थी नाराज

लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : वैद्यकीय पदव्युत्तर अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी जून महिन्यात होणाऱ्या नीट-पीजी या सामाईक प्रवेश परीक्षेच्या रचनेत बदल केला आहे. परीक्षेला काही दिवस शिल्लक असताना हा निर्णय घेतल्याने विद्यार्थ्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. 

दी नॅशनल बोर्ड ऑफ एक्झामिनेशन्सने (एनबीए) याबाबत माहिती देताना आता परीक्षा दोन वेगळ्या भागात विभाजित करण्यात येत असल्याचे जाहीर केले आहे. प्रत्येक विभागाकरिता स्वतंत्र वेळ दिला जाईल. आधी नीट-पीजीचे २०० प्रश्न सोडविण्याकरिता एकत्रितपणे १८० मिनिटे दिली जात होती. 

आता  प्रत्येक विभागातील प्रश्नांची संख्या आणि स्वरूपानुसार वेळ ठरवून दिली जाणार आहे. हे बदल २०२४ पासून होणाऱ्या नीट-पीजीपासूनच लागू केले जाणार आहेत. ही परीक्षा संगणकाधारित असेल. परीक्षेत गैरप्रकार होऊ नये म्हणून हे बदल करण्यात आल्याची माहिती एनबीएने दिली.

होणार काय?
पहिल्या विभागाकरिता दिला गेलेला कालावधी संपेपर्यंत विद्यार्थ्यांना दुसरा विभाग सोडविता येणार नाही. पुढील विभागाची वेळ सुरू झाल्यानंतर मागील विभागातील प्रश्न सोडविता वा दुरुस्त करता येणार नाहीत; परंतु दिलेली वेळ संपेपर्यंत सोडविलेल्या प्रश्नाचे पुनरावलोकन करता येईल.

किमान मॉक टेस्ट तरी घ्यावी
जून महिन्यात नीट-पीजीचे आयोजन केले आहे. एनबीएने किमान विद्यार्थ्यांना मॉक टेस्टची सोय उपलब्ध करून द्यावी, जेणेकरून परीक्षेच्या रचनेबाबत स्पष्टता येईल, अशी मागणी पालकांनी केली.

यामध्ये झाले बदल
नीट-पीजी, नीट-एमडीएस, नीट-एसएस, एफएमजीई, डीएनबी-पीडीसीईटी, जीपॅट, डीपीईई, एफडीएसटी, एफईटी, एनबीईएमएस.

Web Title: NEET-PG exam now department wise; Students are upset with the decision to change the structure at the same time

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :examपरीक्षा