धुळे जिल्ह्यात दोघांचा अपघाती मृत्यू; आकस्मिक मृत्यूची नोंद, वेगवेगळ्या घटना

By अतुल जोशी | Published: March 29, 2024 06:51 PM2024-03-29T18:51:52+5:302024-03-29T18:52:48+5:30

या अपघातात हर्षल वंसत भिल (वय २६, रा. कळमसरे, ता. शिरपूर) हा ठार झाला.

Accidental death of two in Dhule district; Sudden Death Report, Various Incidents | धुळे जिल्ह्यात दोघांचा अपघाती मृत्यू; आकस्मिक मृत्यूची नोंद, वेगवेगळ्या घटना

धुळे जिल्ह्यात दोघांचा अपघाती मृत्यू; आकस्मिक मृत्यूची नोंद, वेगवेगळ्या घटना

धुळे : जिल्ह्यात झालेल्या दोन वेगवेगळ्या अपघातांमध्ये दोन तरुणांचा मृत्यू, तर एकजण जखमी झाल्याची घटना २७ मार्च रोजी पनाखेड (ता. शिरपूर) व जुनवणे (ता. धुळे) येथे घडली. याप्रकरणी संबंधित पोलिस स्टेशनला अपघाताची नोंद करण्यात आली आहे.
चारचाकीची दुचाकीला धडक

भरधाव वेगाने जाणाऱ्या कंटेनरने (क्र. एचआर ३८-वाय ७७५५) समोर चालणाऱ्या दुचाकीला (क्र. एमएच १८-एजी ८९६०) जोरदार धडक दिली. हा अपघात शिरपूर तालुक्यातील पनाखेड ते सांगवीदरम्यान २७ रोजी रात्री ८:३० वाजेच्या सुमारास झाला. या अपघातात हर्षल वंसत भिल (वय २६, रा. कळमसरे, ता. शिरपूर) हा ठार झाला.

तर धुळे तालुक्यातील जुनवणे गावाच्या शिवारात नवीन टोल नाका ते आश्रम शाळेच्या दरम्यान ट्रकने (क्र. एमएच २०-जीबी १०२६) समोर चालणाऱ्या दुचाकीला (क्र. एमएच १८- बीएन ४२९१) जोरदार धडक दिली. हा अपघात २७ मार्च रोजी दुपारी १२ वाजेच्या सुमारास झाला. या अपघातात तुषार रामचंद्र पाटील (वय ३३, रा. गाळण, ता. पाचोरा) हा ठार झाला. तर राजन भिकन पाटील (वय २६, रा. शाहूनगर देवपूर, धुळे) हा जखमी झाला. 

Web Title: Accidental death of two in Dhule district; Sudden Death Report, Various Incidents

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.