लॉटरी खेळण्याच्या व्यसनापायी 'त्याने' ऑफिसच्या पैशांवरच मारला डल्ला; असा झाला पर्दाफाश

By ऑनलाइन लोकमत | Published: May 2, 2024 04:42 PM2024-05-02T16:42:07+5:302024-05-02T16:43:39+5:30

ऑनलाईन लॉटरी खेळण्याचं व्यसन होतं. त्यामुळे तो लॉटरीत घरातील पैसाही खर्च करत असे. आरोपी एका खासगी फायनान्स कंपनीत कामाला होता.

young man embezzled office money due to his addiction to playing lottery | लॉटरी खेळण्याच्या व्यसनापायी 'त्याने' ऑफिसच्या पैशांवरच मारला डल्ला; असा झाला पर्दाफाश

फोटो - ABP News

बिहारच्या कैमूर जिल्ह्यातील दुर्गावती पोलीस ठाण्याच्या पोलिसांनी गुरुवारी एका खोट्या दरोड्याचा पर्दाफाश केला आहे. चोरीचा खोटा गुन्हा दाखल करणाऱ्या आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे. त्याच्या घरातून दीड लाख रुपये आणि चोरीला गेलेला मोबाईल जप्त करण्यात आला आहे. टॅब, बायोमेट्रिक मशीन, पर्स जप्त करण्यात आली आहे. 

अटक करण्यात आलेल्या आरोपीला ऑनलाईन लॉटरी खेळण्याचं व्यसन होतं. त्यामुळे तो लॉटरीत घरातील पैसाही खर्च करत असे. आरोपी एका खासगी फायनान्स कंपनीत कामाला होता. 18 एप्रिल 2024 रोजी दुर्गावती पोलीस ठाण्यात महमूदगंज ते धनेछा दरम्यान चार अज्ञात गुन्हेगारांविरुद्ध खोट्या दरोड्याचा एफआयआर दाखल करण्यात आला होता. पोलीस तपासात हे प्रकरण खोटं असल्याचं निष्पन्न झालं.

पोलिसांनी यानंतर आरोपीला अटक केली. आरोपीने गुन्ह्याची कबुली दिली आहे. रोहतास जिल्ह्यातील राजपूर पोलीस स्टेशन हद्दीतील करमाही गावातील राजदेव सिंग यांचा मुलगा कुश सिंह असं अटक करण्यात आलेल्या आरोपीचं नाव आहे. कैमूरचे एसपी ललित मोहन शर्मा यांनी दिलेल्या माहितीनुसार, 18 एप्रिल 2024 रोजी कुश नावाच्या व्यक्तीने पोलीस ठाण्यात दीड लाख रुपयांच्या लुटमारीचा गुन्हा दाखल केला होता. हे प्रकरण संशयास्पद तपासात असल्याचे दिसून आले. 

पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला असता, अशा अनेक बाबी समोर आल्या, ज्यामुळे दरोड्याची घटना खोटी असल्याचं दिसून आलं. यानंतर पोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन चौकशी सुरू केली. यामध्ये कुशने सांगितलं की, तो भारत फायनान्स कंपनीत फील्ड मॅनेजर म्हणून काम करत असे. त्याने त्यांच्या कंपनीतील दीड लाख रुपये लंपास केले असून, या खोट्या दरोड्याची माहिती पोलिसांना दिली होती.

कंपनीचे लुटण्यात आलेलं साहित्य जप्त करण्यात आले असून दीड लाख रुपये देखील जप्त करण्यात आले आहेत. आरोपीला ऑनलाइन लॉटरी खेळण्याची सवय होती. यामध्ये घरातील 8 ते 10 लाख रुपयांचंही नुकसान झालं आहे. पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत. 
 

Web Title: young man embezzled office money due to his addiction to playing lottery

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.