पत्नीसह दोन मुलींना पेट्रोल ओतून जाळले, तिघींचाही झाला कोळसा; पतीला अटक

By ऑनलाइन लोकमत | Published: March 27, 2024 09:02 AM2024-03-27T09:02:29+5:302024-03-27T09:02:42+5:30

पत्नी ललिता उर्फ ताराबाई सुनील लांडगे (३२), मुलगी साक्षी सुनील लांडगे (१४), खुशी सुनील लांडगे (१३ महिने), अशी मयत झालेल्यांची नावे आहेत. मयत ललिता यांचे वडील भाऊसाहेब गोरे यांनी फिर्याद दिली. 

Two daughters along with wife were burnt with petrol, all three were charred; Husband arrested | पत्नीसह दोन मुलींना पेट्रोल ओतून जाळले, तिघींचाही झाला कोळसा; पतीला अटक

पत्नीसह दोन मुलींना पेट्रोल ओतून जाळले, तिघींचाही झाला कोळसा; पतीला अटक

अहमदनगर : चारित्र्यावर संशय घेत पत्नीसह दोन अल्पवयीन मुलींना पेट्रोल टाकून जिवे मारल्याची घटना सोमवारी सकाळी पिंपळगाव लांडगा (ता. नगर) येथे घडली. पतीने दारूच्या नशेत हे कृत्य केल्याचा  संशय आहे. पती सुनील गोरख लांडगे याला पोलिसांनी अटक केली आहे.    
पत्नी ललिता उर्फ ताराबाई सुनील लांडगे (३२), मुलगी साक्षी सुनील लांडगे (१४), खुशी सुनील लांडगे (१३ महिने), अशी मयत झालेल्यांची नावे आहेत. मयत ललिता यांचे वडील भाऊसाहेब गोरे यांनी फिर्याद दिली. 
सोमवारी सकाळी सुनील लांडगे याने पत्नी व दोन मुलींना घरात कोंडून त्यांच्या अंगावर पेट्रोल टाकून पेटवून दिले. आग एवढ्या मोठ्या प्रमाणात भडकली होती की, कुणाला तिथे जाणे शक्य होत नव्हते. त्यामुळे अग्निशमन विभागाला पाचारण केले. अग्निशमन विभागाने आग नियंत्रणात आणत घराचे कुलूप तोडून आत प्रवेश केला असता आई व दोन मुली जळालेल्या अवस्थेत आढळल्या.  

मुलीकडे गेलो तेव्हा धक्का बसला...  
घटनेपूर्वी सोमवारी आरोपी सासऱ्यांच्या घरी आला. तो म्हणाला की, पत्नी व दोन मुलींना घरात कोंडून आलो. घराची चावी तुमचा मुलगा गणेशकडे दिली आहे. 
तुम्हीच जाऊन कुलूप उघडा नाही तर तिच्यासह मुलींना फुकून टाकीन. त्यामुळे सासरे सोमवारी सकाळी मुलीच्या घरी गेले. तेव्हा त्यांच्यासमोरच  जळालेल्या अवस्थेतील मुलगी व नातींना घरातून बाहेर काढण्यात आले.

‘भरोसा सेल’मध्ये केली होती तक्रार 
 सुनील हा मुलीला वारंवार मारहाण करत असल्याने ‘भरोसा सेल’मध्ये तक्रार केली होती. पोलिसांनी त्याला बोलावून घेऊन समजावून सांगितले होते. त्यानंतर तो मुलीला घेऊन गेला; पण पाच ते सहा दिवसांनी पुन्हा मुलीला मारहाण केली व दोन्ही मुलींना मारण्याची धमकी दिली होती.

Web Title: Two daughters along with wife were burnt with petrol, all three were charred; Husband arrested

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.