निवडणुकीच्या पहाटेच खामगावात हत्येचा थरार! 

By अनिल गवई | Published: April 26, 2024 09:13 AM2024-04-26T09:13:05+5:302024-04-26T09:13:27+5:30

दारू पिण्यासाठी पैसे न दिल्याने एकाचा पाडला मुडदा

Thrill of murder in Khamgaon on election morning! | निवडणुकीच्या पहाटेच खामगावात हत्येचा थरार! 

निवडणुकीच्या पहाटेच खामगावात हत्येचा थरार! 

खामगाव: दारू पिण्यासाठी पैसे देण्यास नकार दिल्याच्या क्षुल्लक कारणावरून एका युवकाची धारधार शस्त्राने हत्या करण्यात आली. दीपक जगदिश सिसोदिया असे मृतकाचे नाव आहे. शुक्रवारी पहाटे ही खळबळ जनक घटना शहराच्या मध्यवस्तीतील मुक्तेश्वर आश्रम परिसरातील मंगल कार्यालयाच्या शौचालयात घडली. याप्रकरणी शहर पोलिसांनी एका आरोपी विरोधात खुनाचा गुन्हा दाखल केला.

तक्रारीनुसार, दीपक जगदिश सिसोदिया आणि त्याचे मित्र स्थानिक मुक्तेश्वर आश्रमासमोर उभे होते. त्यावेळी फरशी येथील हनुमान मंदिरामागे राहणारा राजेंद्र कांडेलकर ३९ हा घटनास्थळी हातात सुरा घेऊन आला. तक्रारदार प्रविण सिसोदिया रा. सुटाळपुरा यांचा भाऊ दीपक याला दारू पिण्यासाठी पैशांची मागणी केली.  दीपकने पैसे देण्यास नकार दिल्याने अश्लील शिविगाळ करीत मारहाण करण्यास सुरूवात केली. त्यावेळी त्यावेळी दीपक आणि त्याचा मित्र ऋषी भोलढाणे जिवाच्या आकांताने मुक्तेश्वर आश्रम परिसरातील मंगल कार्यालयाच्या शौचालयात धावत सुटले. 

मृतक आणि त्याचा मित्र शौचालयात लपले. आरोपी तिथेही धावत सुटला. त्याने दीपकच्या छातीत सुरा भोसकून गंभीर जखमी केले. झटापटीत दीपकच्या मित्र ऋषीच्या हाताला सुरा लागला. यात तो जखमी झाला. जखमी अवस्थेत दीपकला खामगाव येथील सामान्य रूग्णालयात भरती केले. तेथे डॉक्टरांनी तपासणीअंती मृत घोषित केले. घटनेनंतर आरोपी घटनास्थळावरून पसार झाल्याचेही तक्रारीत नमूद आहे. याप्रकरणी शहर पोलीसांनी पोलीस तक्रार आणि वैद्यकीय अहवालावरून आरोपी विरोधात भादंवि कलम ३०२, ३२३, ५०४, सहकलम ३(2) (५ं) अजा ज प्र.कायद्यानुसार गुन्हा दाखल केला. पुढील तपास उपविभागीय पोलीस अधिकारी विनोद ठाकरे करीत आहेत.

आरोपी फिरायचा हातात सुरा घेऊन
प्राप्त माहितीनुसार, गत आठ ते दहा दिवसांपासून सतत हातात सुरा घेऊन फिरत होता. दहशत निर्माण करून तो दारू पिण्यासाठी पैसे मागत होता. दारू पिण्याच्या सवयीचा असलेल्या या आरोपीबाबत स्थानिकांनी शहर पोलिसांत माहितीही दिली होती. मात्र, पोलिसांनी याकडे दुर्लक्ष केल्यानेच हा प्रकार घडल्याची चर्चा घटनास्थळी होत आहे.

Web Title: Thrill of murder in Khamgaon on election morning!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.