ठाण्यात अजब घटना! धक्का लागल्याचा जाब विचारल्याने मद्यपीचा वृद्धावर चाकूने हल्ला

By जितेंद्र कालेकर | Published: May 5, 2024 11:42 PM2024-05-05T23:42:02+5:302024-05-05T23:42:18+5:30

वर्तकनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल

Strange incident in Thane! A drunkard attacked an old man with a knife after asking for his shock | ठाण्यात अजब घटना! धक्का लागल्याचा जाब विचारल्याने मद्यपीचा वृद्धावर चाकूने हल्ला

ठाण्यात अजब घटना! धक्का लागल्याचा जाब विचारल्याने मद्यपीचा वृद्धावर चाकूने हल्ला

जितेंद्र कालेकर, लोकमत न्यूज नेटवर्क, ठाणे: धक्का लागल्याचा जाब विचारणाऱ्या रामदास ढगे (वय ६६, रा. लोकमान्यनगर, ठाणे) या वृद्धावरच वृषभ या मद्यपीने चाकूने खुनी हल्ला केल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी वृषभ याच्याविरुद्ध गुन्हा दाखल झाल्याची माहिती वर्तकनगर पोलिसांनी रविवारी दिली.

लोकमान्यनगर भागात राहणारे रामदास ढगे हे १ मे रोजी सकाळी नऊच्या सुमारास फिरायला गेले होते. त्याचवेळी खताळ डॉक्टर यांच्या गल्लीमध्ये त्यांच्या समोरून वृषभ हा मद्य प्राशन करुन त्याठिकाणी आला. त्याने त्यांना मुद्दाम धक्का दिला. जरा व्यवस्थित चालत जा, आपण वयस्क असल्याचे ढगे यांनी त्याला सुनावले. याचाच राग आल्याने पाठीमागून आलेल्या वृषभ याने त्यांना शिवीगाळ करीत तुला बघतोच, असे सुनावत त्यांच्या डोक्यावर, हातावर चाकूचे वार केले. यात गंभीर जखमी झालेल्या रामदास यांना एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. तर वृषभ याच्याविरुद्ध वर्तकनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Web Title: Strange incident in Thane! A drunkard attacked an old man with a knife after asking for his shock

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.