महामार्गावरील पोलीस बतावणीने घातलेल्या दरोड्याची उकल; 

By ऑनलाइन लोकमत | Published: March 26, 2024 02:44 PM2024-03-26T14:44:50+5:302024-03-26T14:45:23+5:30

चार आरोपींना अटक करून करोडोंचा मुद्देमाल केला हस्तगत

Solved highway police robbery; Four accused were arrested and goods worth crores were seized | महामार्गावरील पोलीस बतावणीने घातलेल्या दरोड्याची उकल; 

महामार्गावरील पोलीस बतावणीने घातलेल्या दरोड्याची उकल; 

- मंगेश कराळे

लोकमत न्यूज  :- गुजरातच्या अंगाडीयाची १७ मार्चला महामार्गावरील खानिवडे टोल नाका पोलीस बतावणी करून घातलेल्या दरोड्याची उकल करण्यात गुन्हे शाखेच्या युनिट तीनच्या पथकाला यश मिळाले आहे. या प्रकरणी चार आरोपींना अटक करून ४ करोड ८७ लाख ५० हजार रुपये, १० लाखांची क्रेटा कार, ३ लाखांची वॅगनार कार, २ लाख ६५ हजारांचे पाच मोबाईल असा एकूण ५ करोड ३ लाख १५ हजारांचा मुद्देमाल हस्तगत केल्याची माहिती गुन्हे शाखेचे पोलीस उपायुक्त अविनाश अंबुरे यांनी मंगळवारी पत्रकार परिषदेत दिली आहे. या गुन्ह्यातील फरार तीन आरोपींचा शोध घेत असल्याची माहितीही त्यांनी दिली.

गुजरातच्या केडीएम अँड एमटेक अंगडीया कंपनीची पाच कोटी पंधरा लाखांची रोख रक्कम घेऊन तीन कर्मचारी सुरत ते मुंबई १७ मार्चला क्रेटा कारने निघाले होते. त्याच रात्री ८ ते ९ वाजण्याच्या सुमारास खानिवडे टोल नाक्याच्या जवळ वॅगनार कारमधून आलेल्या पाच आरोपींनी क्रेटा कारमधील अंगाडीयाच्या कर्मचाऱ्यांना पोलीस असल्याचे बतावणी करून मारहाण केली. तीनपैकी एकाला आरोपींनी त्यांच्या वॅगनार कारमध्ये बसवले. तसेच क्रेटा कारमधील रोख रक्कम आणि दोन कर्मचाऱ्यांना मारहाण व दमदाटी करून त्यांचे मोबाईल फेकून देत वेगवेगळ्या टप्यावर कारमधून उतरवून रोख रकमेसह आरोपी पळून गेले. याबाबत मांडवी पोलिसांनी वेगवेगळ्या कलमानव्ये गुन्हा दाखल केला होता. 

राष्ट्रीय महामार्गावर रात्रौ दरम्यान दरोड्याचा गंभीर गुन्हा असल्याने वरिष्ठांनी गुन्हे शाखेच्या युनिट तीनला तपास देऊन गुन्ह्यांची उकल करण्याचे आदेश दिले. तांत्रिक विश्लेषण आणि मिळालेल्या माहितीच्या आधारे आरोपी मुरगनंदन अभिमन्यू (४६), बाबू मोडा स्वामी (४८), मनीकंडन चलैया (५०) आणि बालाप्रभू शनमुगम (३९) यांना ताब्यात घेऊन अटक केले आहे. आरोपींना वसई न्यायालयात हजर केल्यावर आरोपींना २८ मार्चपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. आरोपी मुरगनंदन अभिमन्यू याच्यावर धारावी पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्ह्यातील दोषसिद्ध आरोपी असल्याचे निष्पन्न झाले आहे.

वरील कामगिरी पोलीस उपायुक्त (गुन्हे) अविनाश अंबुरे, सहाय्यक पोलीस आयुक्त मदन बल्लाळ यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक प्रमोद बडाख, पोउपनिरी अभिजित टेलर, उमेश भागवत, पोलीस हवालदार अशोक पाटील, मनोज चव्हाण, सचिन घेरे, मुकेश तटकरे, सागर बारवकर, आश्विन पाटील, राकेश पवार, सुमित जाधव, सुनिल पाटील, युवराज वाघमोडे, आतिश पवार, मनोहर तारडे, तुषार दळवी, प्रविण वानखेडे, गणेश यादव, सागर सोनवणे आणि सायबर सेलचे संतोष चव्हाण यांनी पार पाडली आहे.

चालकच निघाला गुन्ह्याचा मास्टर माईंड

अंगाडीया कंपनीतील चालक बाबू स्वामी यानेच आरोपींना रोख रक्कम घेऊन निघाल्याची माहिती दिली होती. त्याच्या माहितीवरून हा प्लान आखल्याचे पोलीस तपासात उघड झाले आहे.

Web Title: Solved highway police robbery; Four accused were arrested and goods worth crores were seized

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.