लाखात कोटींचे आमिष दाखवून गंडा; क्रिप्टो करन्सीत गुंतविले सात लाख

By ऑनलाइन लोकमत | Published: March 25, 2024 08:08 AM2024-03-25T08:08:33+5:302024-03-25T08:09:08+5:30

छत्रपती चौक येथील संजय विठ्ठलराव आठवले यांना प्रिन्स अग्रवाल, रजनीकांत चिट्टे आणि मनोज चव्हाण या तिघांनी हाय ओशियन क्रिप्टो करन्सीत पैसे गुंतविण्याचे आमिष दाखविले होते.

Scamming by showing the lure of lakhs of crores; 7 lakh invested in crypto currency | लाखात कोटींचे आमिष दाखवून गंडा; क्रिप्टो करन्सीत गुंतविले सात लाख

लाखात कोटींचे आमिष दाखवून गंडा; क्रिप्टो करन्सीत गुंतविले सात लाख

नांदेड :   क्रिप्टो करन्सीत गुंतवणूक केल्यास लाख रुपयांचे कोटी होतील असे आमिष दाखवून इस्टेट एजंटला सात लाख रुपयांचा गंडा घालण्यात आला. ही घटना भाग्यनगर पोलिस ठाण्याच्या हद्दीत घडली. या प्रकरणात पोलिसांनी तिघांविरुद्ध गुन्हा नोंदविला आहे. 
छत्रपती चौक येथील संजय विठ्ठलराव आठवले यांना प्रिन्स अग्रवाल, रजनीकांत चिट्टे आणि मनोज चव्हाण या तिघांनी हाय ओशियन क्रिप्टो करन्सीत पैसे गुंतविण्याचे आमिष दाखविले होते.

लाख रुपये गुंतविल्यास कोट्यवधी रुपये मिळतील असे सांगण्यात आले होते. त्यानुसार आठवले यांनी क्रिप्टो करन्सीत सात लाख रुपये गुंतविले होते. परंतु त्यानंतर आठवले यांची फसवणूक करण्यात आली. या प्रकरणात आठवले यांनी भाग्यनगर पोलिस ठाण्यात धाव घेतली होती.

दरम्यान, काही वर्षांपूर्वी नांदेडात बिटकाॅईनच्या बदल्यात गेन बिटकाॅईन देण्याचे आमिष दाखवून अनेकांना जवळपास १०० कोटी रुपयांचा गंडा घालण्यात आला होता. त्यात अनेक डाॅक्टर, उद्योजक यांचाही समावेश होता. 

Web Title: Scamming by showing the lure of lakhs of crores; 7 lakh invested in crypto currency

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.