निवृत्त व्यवस्थापकाला ३६ लाखांनी गंडविले, सायबर पोलिसात तक्रार

By ऑनलाइन लोकमत | Published: March 25, 2024 09:14 AM2024-03-25T09:14:01+5:302024-03-25T09:14:14+5:30

खाजगी कंपनीतून सहायक व्यवस्थापक पदावरून निवृत्त झालेले ७८ वर्षांचे ज्येष्ठ नागरिक हिंगणा पोलिस ठाण्याच्या हद्दीत गवसी मानापूर येथे राहतात.

Retired manager duped by 36 lakhs, complaint to cyber police | निवृत्त व्यवस्थापकाला ३६ लाखांनी गंडविले, सायबर पोलिसात तक्रार

निवृत्त व्यवस्थापकाला ३६ लाखांनी गंडविले, सायबर पोलिसात तक्रार

नागपूर : स्टॉक ट्रेडिंगमध्ये गुंतवणूक केल्यास जास्त नफा देण्याचे आमिष दाखवून सायबर गुन्हेगाराने ७८ वर्षीय निवृत्त सहायक व्यवस्थापकाला ३६ लाख ७७ हजार ५०० रुपयांनी ऑनलाइन गंडविले. 

खाजगी कंपनीतून सहायक व्यवस्थापक पदावरून निवृत्त झालेले ७८ वर्षांचे ज्येष्ठ नागरिक हिंगणा पोलिस ठाण्याच्या हद्दीत गवसी मानापूर येथे राहतात. सायबर गुन्हेगाराने त्यांचा विश्वास संपादन करून ट्रेडिंगच्या नावावर जास्त नफा देण्याचे आमिष दाखविले.

आरोपीने आरटीजीएस व ऑनलाइनद्वारे ३६ लाख ७७ हजार ५०० रुपये भरण्यास भाग पाडून त्यांना कोणताही नफा न देता त्यांची फसवणूक केली. याबाबत  त्यांनी सायबर पोलिसात तक्रार दिली.

Web Title: Retired manager duped by 36 lakhs, complaint to cyber police

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.