लग्नास विरोध झाल्याने आत्येबहिणीस संपविले, होळीच्या पूर्वसंध्येला बीड जिल्ह्यातील दुर्दैवी घटना

By ऑनलाइन लोकमत | Published: March 25, 2024 09:34 AM2024-03-25T09:34:58+5:302024-03-25T09:35:13+5:30

हा गुन्हा केल्यानंतर मुख्य आरोपी भगवान गायकवाड याने विष प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केला. त्याच्यावर येथील जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

Opposition to marriage ends sisters in low , an unfortunate incident in Beed district on the eve of Holi | लग्नास विरोध झाल्याने आत्येबहिणीस संपविले, होळीच्या पूर्वसंध्येला बीड जिल्ह्यातील दुर्दैवी घटना

लग्नास विरोध झाल्याने आत्येबहिणीस संपविले, होळीच्या पूर्वसंध्येला बीड जिल्ह्यातील दुर्दैवी घटना

बीड : लग्नास नातेवाइकांनी विरोध केल्याने अल्पवयीन मुलीचा तिचा प्रियकर असलेल्या मामाच्या मुलाने खून केला. याप्रकरणी पाच जणांविरुद्ध येथील ग्रामीण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला. या प्रकरणी अटक केलेल्या दोघांना २७ मार्चपर्यंत तीन दिवस पोलिस कोठडीचे आदेश न्यायालयाने दिले आहेत. हा गुन्हा केल्यानंतर मुख्य आरोपी भगवान गायकवाड याने विष प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केला. त्याच्यावर येथील जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

घोसापुरी येथील अल्पवयीन मुलीचे तिच्या मामाच्या मुलाशी प्रेमसंबंध होते.   मुलीचे वय कमी होते. तसेच मुलाला  व्यसन असल्याने त्याच्यासोबत लग्न नको म्हणून नातेवाइकांचा विरोध होता. आपले लग्न होणार नाही या भावनेतून भगवान याने आत्याच्या मुलीचा दगडाने ठेचून खून केला. या प्रकरणी भगवान वैजनाथ गायकवाड, वैजनाथ माणिक गायकवाड, बाळू माणिक गायकवाड, रमेश गव्हाणे, अंकुश विश्वनाथ माळी यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.

दोन आरोपींचा शोध सुरू
खून करण्यात आलेली मुलगी अल्पवयीन आहे. याप्रकरणी दोन आरोपी अटकेत आहेत. तिसरा भगवान याच्यावर उपचार सुरू आहेत. अन्य दोन आरोपींचा शोध पोलिस घेत आहेत. मयत मुलीवर सामूहिक अत्याचार झालेला नाही. जिल्हा रुग्णालयात मृतदेहाचे शवविच्छेदन केले. मयत मुलगी व भगवान यांचे प्रेमसंबंध होते. नातेवाइकांचा विरोध असल्याने ही घटना घडली. तपास सुरू आहे, असे पोनि बंटेवाड यांनी सांगितले.

दोघांना अटक, तीन दिवसांची कोठडी
शनिवारी रात्री खुनाचा गुन्हा घडला. रविवारी सकाळी ही घटना उघडकीस आल्यानंतर एकच खळबळ उडाली. पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा केला.
या प्रकरणी पोलिसांनी भगवानचे वडील वैजनाथ माणिक गायकवाड आणि अंकुश विश्वनाथ माळी यांना अटक केली असून दोघांना तीन दिवस पोलिस कोठडीचे आदेश न्यायालयाने दिल्याचे पोनि शिवाजी बंटेवाड यांनी सांगितले.

गुन्हा केल्यानंतर आरोपीने घेतले विषारी द्रव
शनिवारी भगवान याने प्रेयसी असलेल्या मामाच्या मुलीला फोन करून घरापासून जवळच असलेल्या ओढ्याजवळ बोलावून घेतले व तिच्या डोक्यात दगड घालून खून केला. सदर मुलगी घरी उशिरापर्यंत न आल्याने तिच्या नातेवाइकांनी शोधाशोध केली. 
संशय आल्याने भगवान याला फोन करण्याचा प्रयत्न केला, पण तो बंद येत होता. दरम्यान, आरोपी भगवान याने विषारी द्रव प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केला.

Web Title: Opposition to marriage ends sisters in low , an unfortunate incident in Beed district on the eve of Holi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.