खुन्याची माहिती देणाऱ्यास मिळेल ५० हजारांचे बक्षीस

By ऑनलाइन लोकमत | Published: March 25, 2024 06:49 AM2024-03-25T06:49:48+5:302024-03-25T06:49:58+5:30

अखेर बाळापूर पोलिसांनी खुनी आरोपीचा शोध घेण्याकामी जाहिरात प्रसिद्ध केली.

A reward of Rs 50,000 will be given to those who inform about the murder | खुन्याची माहिती देणाऱ्यास मिळेल ५० हजारांचे बक्षीस

खुन्याची माहिती देणाऱ्यास मिळेल ५० हजारांचे बक्षीस

आखाडा बाळापूर (जि. हिंगोली) :  भरदिवसा कार्यालयातच आपल्या वरिष्ठाचा निर्घृण खून करून फरार झालेला आरोपी पोलिसांना काही केल्या सापडत नाही. आरोपीच्या शोधात गेलेली पथके रिकाम्या हाताने परतली आहेत. अखेर बाळापूर पोलिसांनी खुनी आरोपीचा शोध घेण्याकामी जाहिरात प्रसिद्ध केली.

आरोपीची माहिती देणाऱ्यास तब्बल ५० हजारांचे बक्षीस पोलिसांच्या वतीने देण्यात येणार आहे. आखाडा बाळापूर शहरानजीक असलेल्या बीजगुणन केंद्रात १४ मार्च रोजी दुपारी १२ बाजेच्या सुमारास शेतकरी प्रशिक्षण केंद्रातील  कृषी पर्यवेक्षक राजेश कोल्हाळ यांचा त्यांच्या कार्यालयातच धारदार शस्त्राने वार करून खून करण्यात आला.  सीडफॉर्ममध्येच कार्यरत असलेल्या पांडुरंग कचरू भालेराव (वय ५८) या रोजंदारी कामगाराविरोधात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला.

१४ तारखेपासून बाळापूर पोलिस, स्थानिक गुन्हे शाखेचे दोन पथके गुन्हेगाराचा शोध घेत आहेत. परंतु आरोपी अद्याप त्यांच्या हाती लागला नाही. 
 त्यामुळे हिंगोली पोलिसांनी आता आरोपीची माहिती देणाऱ्यास बक्षीस जाहीर केले आहे. आरोपीची माहिती देणाऱ्यास तब्बल ५० हजार रुपयांचे बक्षीस बाळापूर पोलिस देणार आहेत.

Web Title: A reward of Rs 50,000 will be given to those who inform about the murder

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.