ट्रॅक्टर उलटून २० जण जखमी

By Admin | Published: February 18, 2015 12:29 AM2015-02-18T00:29:04+5:302015-02-18T00:41:05+5:30

भोकरदन : वालसा- खालसा शिवारातील महादेवाच्या दर्शनावरून परत येणारा ट्रॅक्टर पलटी झाला. या अपघातात लिंगेवाडी येथील २० भाविक किरकोळ जखमी झाले

Twenty-two people were injured in the accident | ट्रॅक्टर उलटून २० जण जखमी

ट्रॅक्टर उलटून २० जण जखमी

googlenewsNext


भोकरदन : वालसा- खालसा शिवारातील महादेवाच्या दर्शनावरून परत येणारा ट्रॅक्टर पलटी झाला. या अपघातात लिंगेवाडी येथील २० भाविक किरकोळ जखमी झाले आहेत़ ही घटना दुपारी ३ वाजेच्या सुमारास घडली.
लिंगेवाडी येथील भाविक एका ट्रॅक्टरमध्ये वालसा खालसा शिवारातील मेळाचा महादेव मंदिरात दर्शनासाठी गेले होते. दर्शन घेऊन भाविक परतत असताना दोन्ही वालसा गावाच्या मध्ये चालकाचा ट्रॅक्टरवरील ताबा सुटला. ट्रॅक्टर पलटी झाल्याने त्यातील भाविक बाहेर फेकल्या गेले. यात भाविकांना किरकोळ जखमा झाल्या. जखमींमध्ये अंजनाबाई सांबळे (६०), सोनाली साबळे (३५), तुळसाबाई सांबळे (३५), संगीता मुळे (३६), गीता लोखंडे (१६), कौशल्या साबळे (३६), वैभव साबळे (७), रेखा साबळे (३६), सीमा साबळे (१२), गयाबाई मिसाळ (६५), नारायण साबळे (२४), आदित्य घोडके (६), मनिषा जाधव (१४), मंगल तांबे (३५), सविता तांबे (३०), आशा साबळे (२५), प्रतिक तांबे (६), मनिषा साबळे (१५) यांच्यासह काही भाविक जखमी झाले आहेत.
जखमींना तात्काळ नजीकच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. (वार्ताहर)
या जखमींवर भोकरदन येथील ग्रामीण रूग्णालयात वैद्यकीय अधिकारी डॉ. नितीन इंगळे, एस़एऩलोखंडे, डी़एऩभातकवडे, एऩपी़पोटे, आसेफभाई यांनी औषधोपचार केले आहे. काही जखमींनी सिल्लोड व शहरातील खाजगी रूग्णालयात औषघ उपचार घेतले आहे. या अपघाताची माहिती मिळताच लिंगेवाडीचे सरपंच कमलाकर सांबळे, अ‍ॅड शंकरराव सांबळे यांनी भोकरदन ग्रामीण रूग्णालयात येऊन जखमीची विचारपुस केली. या प्रकरणात रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल झाला नव्हता़

Web Title: Twenty-two people were injured in the accident

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.