दुचाकीच्या बॅटरीवर चालते भट्टी

By Admin | Published: February 18, 2015 12:33 AM2015-02-18T00:33:17+5:302015-02-18T00:42:21+5:30

लातूर : कुटुंबाला आर्थिक मदत करण्यासाठी कल्पकतेच्या जोरावर चिकलठाण्याच्या व्यंकट बालाजी भरबडे ने दुचाकीच्या बॅटरीवर छोटी भट्टी,

Furnace running on a two-wheeler battery | दुचाकीच्या बॅटरीवर चालते भट्टी

दुचाकीच्या बॅटरीवर चालते भट्टी

googlenewsNext

 

लातूर : कुटुंबाला आर्थिक मदत करण्यासाठी कल्पकतेच्या जोरावर चिकलठाण्याच्या व्यंकट बालाजी भरबडे ने दुचाकीच्या बॅटरीवर छोटी भट्टी, त्याला छोटा पंखा बसवून त्याच्यापासून येणाऱ्या वाऱ्यावर दिवसभर सुमारे ३०० चहा बनवून आपले ग्राहकाला मागेल तेथे चहा कॅन्टीन चालवून बेकारीवर मात आणि कुटुंबाला आर्थिक मदत करण्याची कल्पकता ‘थ्री इडिएट’ मधल्या ‘रांच्यो’ प्रमाने अवलंबविली आहे़
लातूर तालुक्यातील चिकलठाणा येथील एका शेतकरी कुटुंबात जन्मलेल्या व्यंकट भरबडेच्या घरची आर्थिक परिस्थिती अत्यंत बेताची़ दहावीे पास झाल्या नंतर इतर मुलाप्रमाणे शिकण्याची इच्छा असूनही परिस्थितीमुळे शिक्षणापेक्षा कुटुंबाला आर्थिक मदत कशी मिळेल, याचा विचार सतत डोक्यत घोळत होता़ मोठा भाऊ गोविंद यालाही १२ वी पर्यंतच शिकता आले़ तोही कामाच्या शोधात़ काही दिवसांपूर्वी ‘थ्री इडिएट ’ हा चित्रपट बघितला अन् कल्पकतेच्या भरारीत दुचाकीच्या बॅटरीवर कोळशाच्या भट्टयाला छोट्या पंख्यांच्या सहाय्याने हावेवर चालणारी भट्टी सुरू केली़ भट्टीचा उपयोग करून कॅन्टीन सुरु केले़ यामुळे बेकारीवर मातही करता आली़ हे कॅन्टीन लातूरच्या गोलाई परिसरात चापसी मेडिकलच्या बाजूस एका छोट्या ओट्यावर सुरु केले़ दररोज चिकलठाणा ते लातूर १६ किलोमिटरच्या प्रवासात बॅटरी आपोआप चार्ज होते़ तिच्या कनेक्शनवर दिवसभर पंखा चालू राहतो़ सकाळी ७ वाजता येताच २५ लिटर दूध व अर्धा किलो चहा पावडर, २० ते २५ पुड्या कॉफी, मग सुरू होते कामाची धावपऴ दोघे भाऊ मिळून एक जण चहा तयार करतो, तर दुसरा ज्यांचा फोन येईल, त्यांच्या दुकानी जाऊन चहा देतो़ दिवसाकाठी ३०० चहा , २५ दूध, ३० कॉफीचा दोन हजार रूपयांचा गल्ला गोळा केला जातो़ दोन्ही भावांनी मिळून बेकारीवर मात केली़ आपल्या कल्पकतेच्या जोरावर कॅन्टीन सुरू केली़ त्यामुळे त्यांच्या कुटुंबात आर्थिक सक्षमताही आली आहे़ मागील दोन वर्षांपासून चांगलेच कॅन्टीन जोरात सुरुआहे़ ग्राहक चहा पिताना गाडीकडे आवर्जून बघतात़ काय असेल ही कल्पकता याबद्दल आश्चर्यही व्यक्त करतात़
गंजगोलाई परिसरात दुचाकी लाऊन व्यंकट चहाचा व्यवसाय करतो़ ग्राहक त्याच्याशी भ्रमणध्वनीवर संपर्क साधतात़ आणि दिवसभर चालते व्यंकटची मोबाईल ‘टी’ सेवा़

Web Title: Furnace running on a two-wheeler battery

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.