सीसीटिव्ही कॅमेरे आता चौकशीच्या फेऱ्यात

By Admin | Published: February 18, 2015 12:31 AM2015-02-18T00:31:37+5:302015-02-18T00:41:26+5:30

संजय कुलकर्णी , जालना शहरात ३५ चौकांमध्ये सीसीटिव्ही कॅमेरे बसविण्याचे काम अद्यापही पूर्ण झालेले नाही.

CCTV cameras are now in the investigation round | सीसीटिव्ही कॅमेरे आता चौकशीच्या फेऱ्यात

सीसीटिव्ही कॅमेरे आता चौकशीच्या फेऱ्यात

googlenewsNext


संजय कुलकर्णी , जालना
शहरात ३५ चौकांमध्ये सीसीटिव्ही कॅमेरे बसविण्याचे काम अद्यापही पूर्ण झालेले नाही. अशा परिस्थितीत जिल्हा नियोजन समितीच्या दोन सदस्यांनी या कॅमेऱ्यांच्या निकृष्टपणाबद्दल केलेल्या तक्रारीनंतर नगरपालिकेने चौकशी केली. परंतु त्याचा अहवाल अद्याप गुलदस्त्यात आहे.
जिल्हा नियोजन समितीच्या नाविन्यपूर्ण योजनेद्वारे शहरात ३५ चौकांमध्ये प्रत्येकी दोन असे ७० सीसीटिव्ही कॅमेरे बसविण्यासाठी ४६ लाख ९८ हजार ३३० रुपयांचा निधी देण्यात आला. सहा महिन्यांच्या मुदतीच्या या कामासाठी साडेपाच महिने पूर्ण झाल्यानंतरही केवळ १६ चौकांमध्येच कॅमेरे सुरू झाल्याचा दावा संबंधित एजन्सीकडून केला जात आहे. ३२ चौकांमध्ये कॅमेरे बसविले होते. ते सुरूही झाले, परंतु नंतर १६ चौकांमधील कॅमेरे बंद पडले.
जालना नगरपालिका व पोलीस अधीक्षक कार्यालय अशा दोन्ही कार्यालयांनी मिळून हे काम पूर्ण करावे, असे नियोजन समितीच्या बैठकीत ठरले होते.
त्यासाठी नगरपालिका व पोलीस अधीक्षक कार्यालयाची समन्वय समिती असणे आवश्यक होते. परंतु नगरपालिकेने अशा प्रकारची समिती स्थापन न करता परस्पर निविदा प्रक्रिया व कामाचे देयक अदा करण्याचे काम केले आहे.
आॅगस्ट २०१४ मध्ये नगरपालिकेने हे काम निविदा काढून एका एजन्सीकडे सोपविले होते. या कामासाठी सहा महिन्यांचा कालावधी देण्यात आला. त्यानुसार २८ फेब्रुवारी २०१५ रोजी या कामाची मुदत संपणार आहे.
परंतु गेल्या साडेपाच महिन्यांच्या काळात १६ चौकांमधील कॅमेरेच सुरू झाले. आतापर्यंतच्या कामाबद्दल नगरपालिकेने संबंधित एजन्सीला २३ लाखांचे म्हणजेच ५० टक्के देयक अदा केले आहे.
ज्या एजन्सीने सीसीटिव्ही कॅमेरे बसविण्याचे काम घेतले आहे, त्यासाठी त्यांनी कॅमेऱ्यांची गुणवत्ता सिद्ध करावी, असे नियोजन समितीच्या सदस्या संध्या संजय देठे यांनी म्हटले आहे. महिलांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने चौकाचौकात बसविण्यात येणारे कॅमेरे हा महत्त्वाचा विषय आहे. परंतु काम पाहिजे, त्या गुणवत्तेने होत नसल्याने आपण नियोजन समितीकडे तक्रार केली.
४ कॅमेरे निकृष्ट असल्याबद्दल नियोजन समिती सदस्यांनी केलेल्या तक्रारीसंदर्भात आपण चौकशी करून अहवाल मुख्याधिकाऱ्यांकडे दिला आहे. त्यामुळे अहवालासंबंधी आपण काही बोलू शकत नाही, असे नगरपालिका विद्युत विभागाचे अभियंता पोलास यांनी सांगितले. २३ लाखांचे देयक आतापर्यंत संबंधित एजन्सीला अदा करण्यात आल्याचेही ते म्हणाले.
४३५ चौकांमध्ये लागणाऱ्या ७० कॅमेऱ्यांवर जिल्हा नियंत्रण कक्षातील पोलीस लक्ष ठेवणार आहेत. मात्र त्यासाठी संबंधित एजन्सीने ३२ इंचीचा एक कलर टिव्ही दिला. त्यावर ७० फुटेजचे नियंत्रण ठेवणे शक्य नसल्याने पोलीस अधीक्षक कार्यालयानेच त्यांच्याकडील ४० इंची जुन्या कलर टिव्हीची व्यवस्था या फुटेजवर नियंत्रण ठेवण्यासाठी केली आहे.

Web Title: CCTV cameras are now in the investigation round

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.