पं. गोविंदराव जळगावकर संगीत महोत्सवास प्रारंभ

By Admin | Published: February 18, 2015 12:30 AM2015-02-18T00:30:08+5:302015-02-18T00:41:13+5:30

अरूण घोडे/रवी गात , अंबड गायनाचार्य गोविंदराव जळगावकर स्मृतीनिमित्त श्री दत्त जयंती संगीत महोत्सवाची सुरुवात अत्यंत साधेपणाने झाली.

Pt Govindrao Jalgaonkar Music Festival started | पं. गोविंदराव जळगावकर संगीत महोत्सवास प्रारंभ

पं. गोविंदराव जळगावकर संगीत महोत्सवास प्रारंभ

googlenewsNext



अरूण घोडे/रवी गात , अंबड
गायनाचार्य गोविंदराव जळगावकर स्मृतीनिमित्त श्री दत्त जयंती संगीत महोत्सवाची सुरुवात अत्यंत साधेपणाने झाली.
दरम्यान, माजी गृहमंत्री आर.आर.पाटील यांच्या आकस्मिक निधनामुळे १६ फेबु्रवारी रद्द झालेल्या सर्व कलाकारांनी आपापल्या वेळेचे योगदान देऊन अत्यल्प वेळात आपली प्रस्तुती सादर करण्यास संमती देऊन वेळेवर कार्यक्रमाला सुरुवात केली. भक्तीप्रधान राग केदारमध्ये ईशस्तवन स्वरानंद सूर्यवंशी यांनी सादर केले. संवादिनीवर साथ शिवदास देगलुरकर तर तबल्यावर साथ गोविंदरावांचे चिरंजीव धनजंय जळगावकर यांनी दिली. दीपक भानुसे यांच्या बासरी वादनाने वातावरण तयार झाले. अत्यंत कमी वेळात बासरीवर राग बागेश्री त्यांनी अत्यंत प्रभावीपणे सादर केला. या समर्पक पण प्रभावी बासरीवादनानंतर मंजुषा पाटील यांनी समयानुरुप राग श्री ने सुरुवात केली. तिलवाडा तालात निबध्द ही रचना ग्वाल्हेर आग्रा घराण्याच्या सुंदर मिलापाने रसिकांच्या मनाची पकड घेतली. या गायिकीला दिलेला वेळ संपत आल्याने त्यांनी रसिकांनी विचारले असता रसिकांनी आणखी वेळ वाढवून दिला. मंजुषातार्इंनी भुपरागात ‘जब से तुम संग लागे ख्याल ’आणि द्रुत सादर केली.
या ठुमरीने श्रीकृष्णाच्या रासलिलेचे वातावरण उभे केले. रासलिलांचे स्वरात्मक चित्र आपल्या समर्थ गायकीने इतके सुंदर रंगले की, रसिक हरखुन गेले. एखाद्या सिध्दहस्त चित्रकाराने आधी स्केच कराव ं(रेखाचित्र) आणि त्यानंतर रंग भरावे तसे रंग भरण्याचे काम रोहित मजुमदार यांच्या तालाने आणि उदय कुलकर्णी यांच्या संवादिनीने केले. मंजुषा पाटील यांच्या काळजाना हात घालणाऱ्या स्वरांनी रसिकांना खिळवून ठेवले. तेवढ्यात नाट्यगीत विधा आणि भजन यांचा एकत्र वापर करीत ‘जोहार माय बाप जोहार’ सादर केला. ‘जोहार माय बाप जोहार’ यातील जोहारच्या भेदकतेने रसिकांना घायाळ केले.

Web Title: Pt Govindrao Jalgaonkar Music Festival started

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.