दीर्घ आजाराला कंटाळून ९४ वर्षीय वयोवृध्दाची पेटवून घेऊन आत्महत्या

By प्रदीप भाकरे | Published: May 2, 2024 08:04 PM2024-05-02T20:04:27+5:302024-05-02T20:05:45+5:30

श्यामराव यांना अर्धांगवायूचा झटका आल्याने ते आजारी होते.

A 94-year-old man committed suicide by setting himself on fire due to chronic illness | दीर्घ आजाराला कंटाळून ९४ वर्षीय वयोवृध्दाची पेटवून घेऊन आत्महत्या

दीर्घ आजाराला कंटाळून ९४ वर्षीय वयोवृध्दाची पेटवून घेऊन आत्महत्या

अमरावती: दीर्घ आजाराला कंटाळून एका ९४ वर्षीय वृद्धाने स्वत:ला पेटवून घेऊन आत्महत्या केली. ही घटना १ मे रोजी पहाटे ४ वाजताच्या सुमारास बडनेरा ठाण्याच्या हद्दीतील म्हाडा कॉलनी येथे उघडकीस आली. श्यामराव देवराव ढोरे (९४, रा. म्हाडा कॉलनी, बडनेरा) असे मृतकाचे नाव आहे.

श्यामराव यांना अर्धांगवायूचा झटका आल्याने ते आजारी होते. नित्यनियमाचे काम करतानाही त्यांना त्रास होता. त्यामुळे ते नेहमी निराश राहत होते. दरम्यान, ३० एप्रिल रोजी रात्री ते घरातील वरच्या माळ्यावरील आपल्या खोलीत झोपायला गेले. त्यांचा मुलगा, सून व नातू खाली झोपले होते. पहाटे ४ वाजताच्या सुमारास अचानक ओरडण्याचा आवाज आल्याने त्यांचा मुलगा व सून जागी झाले.

त्यांनी श्यामराव यांच्या खोलीकडे जाऊन बघितले. त्यावेळी श्यामराव यांनी पोर्चमध्ये वाळायला घातलेले कपडे अंगावर घेऊन स्वत:ला जाळून घेतल्याचे त्यांना दिसून आले. त्यांनी श्यामराव यांच्या अंगावर पाणी टाकून आग विझविली. तसेच तातडीने पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी घटनास्थळ गाठून श्यामराव यांना जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल केले. मात्र, डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. या प्रकरणी मृतक श्यामराव यांच्या सूनेने बडनेरा ठाण्यात तक्रार दाखल केली. या प्रकरणी पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली.

Web Title: A 94-year-old man committed suicide by setting himself on fire due to chronic illness

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.