शासन नोंदीशिवाय बेरोजगारांना नोकरीसाठी परदेशी पाठविणाऱ्या महिलेस पोलीसांनी केली अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 18, 2018 11:30 PM2018-05-18T23:30:51+5:302018-05-18T23:30:51+5:30

Police arrests women unemployed for foreign jobs without government records | शासन नोंदीशिवाय बेरोजगारांना नोकरीसाठी परदेशी पाठविणाऱ्या महिलेस पोलीसांनी केली अटक

शासन नोंदीशिवाय बेरोजगारांना नोकरीसाठी परदेशी पाठविणाऱ्या महिलेस पोलीसांनी केली अटक

Next
ठळक मुद्देउत्प्रवास कार्यालयांत नोंद न करता बेरोजगारांना परदेशी पाठविलेसौदीमध्ये गेलेल्या तीन महिलांपैकी एक भिवंडीत परतली नाहीपरदेशी नोकरीसाठी व कागदपत्रांसाठी एजंटचे सहाय्य

भिवंडी : शासनाच्या परदेश मंत्रालयातील उत्प्रवास कार्यालयांत नोंद न करता बेरोजगार महिलांना परस्पर एजंटमार्फत परदेशी नोकरीसाठी पाठविणाºया महिलेस पोलीसांनी अटक केली आहे.
शहरातील नदीनाका येथे रहाणारा अन्वर अन्सारी व त्याची पत्नी सुरय्या अन्वर अन्सारी हे दोघे बेरोजगार महिलांना परदेशी नोकरी लावण्याचे काम करीत असून त्यासाठी लागणारे व्हिसा व पासपोर्ट ते एजंटमार्फत काढून देत होते. तसेच त्यांना ज्या देशांत कामासाठी पाठवित होते तेथील एजंटशी संपर्क करून ते नोकरी मिळवून देत होते. परंतू यासाठी शासनाच्या परदेश मंत्रालयांतील उत्प्रवास कार्यालयांत नोंद करणे अपेक्षीत असताना शासनाने नेमलेल्या संस्थामध्ये त्यांनी बेरोजगारांची नोंद न केली नाही. अशा प्रकारे या अन्सारी दाम्पत्याने शहरातील तीन महिलांना सौदीमध्ये पाठविले होते. त्यापैकी दोन महिला शहरात परत आल्या आहेत. तर एक महिला त्यांच्याबरोबर परत आली नाही. ही घटना निदर्शनास आल्याने उत्प्रवास कार्यालयांतील सहाय्यक कक्ष अधिकारी संजय राजेंद्र गुजापल्ली यांनी निजामपूर पोलीस ठाण्यात शासनाकडे नोंद न करता बेरोजगारांना परदेशी पाठविणारे अन्वर अन्सारी व त्याची पत्नी सुरय्या या दोघांविरोधात अधिनियम १९८३ प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे.त्यानुसार पोलीस कारवाईसाठी शहरातील नदीनाका येथे गेले असता अन्वर अन्सारी फरार झाल्याची माहिती मिळाली.त्यामुळे पोलीसांनी सुरय्या अन्वर अन्सारी हिला अटक करून तीला कोर्टात हजर केले. कोर्टाने तीला न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.

Web Title: Police arrests women unemployed for foreign jobs without government records

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.