जुन्नर शहराच्या प्रवेशद्वाराला शिवरायांचे नाव

By admin | Published: March 21, 2017 04:59 AM2017-03-21T04:59:29+5:302017-03-21T04:59:29+5:30

जुन्नर शहराच्या प्रमुख प्रवेशद्वाराला (वेशीला) ‘छत्रपती शिवाजीमहाराज प्रवेशद्वार’ व नगर परिषदेच्या व्यायामशाळेला

Shivrajaya's name at the entrance of Junnar city | जुन्नर शहराच्या प्रवेशद्वाराला शिवरायांचे नाव

जुन्नर शहराच्या प्रवेशद्वाराला शिवरायांचे नाव

Next

जुन्नर : जुन्नर शहराच्या प्रमुख प्रवेशद्वाराला (वेशीला) ‘छत्रपती शिवाजीमहाराज प्रवेशद्वार’ व नगर परिषदेच्या व्यायामशाळेला ‘स्वातंत्र्यवीर वि. दा. सावरकर व्यायामशाळा’ असे नाव देण्याचा ठराव नगरपालिकेच्या विशेष सभेत मंजूर करण्यात आल्याची माहिती नगराध्यक्ष श्याम पांडे यांनी दिली.
विशेष सभेसाठी शिवसेना गटनेते दीपेश परदेशी, समीर भगत, आविन फुलपगार, नगरसेविका अंकिता गोसावी, सुवर्णा बनकर आदी या वेळी उपस्थित होते.
छत्रपती शिवाजीमहाराज प्रवेशद्वार, स्वातंत्र्यवीर वि. दा. सावरकर व्यायामशाळा असे नाव देण्याची सूचना नगरसेविका अंकिता गोसावी यांनी मांडली होती. शिवसेना गटनेते दीपेश परदेशी यांनी ठरावास अनुमोदन दिले.
नगरपालिकेची वादग्रस्त व अपूर्ण अवस्थेत असलेली पाणीपुरवठा योजना, तसेच जलशुद्धीकरण यंत्रणा जर ठेकेदाराने दोन महिन्यांत पूर्ण करून दिली नाही, तर ठेकेदाराची संपूर्ण अनामत व दंडात्मक रक्कम नगरपालिकेत जमा करून कारवाई करण्याची सूचना नगरसेवक समीर भगत यांनी मांडली. त्यास अविनाश कर्डिले यांनी अनुमोदन दिले.
कुकडी नदीपात्रात असलेल्या बंधाऱ्यांची साठवण क्षमता वाढविण्यासाठी, तसेच शहरातील बांधकाम पूर्ण होत असलेली भाजी मंडई लवकर सुरू करण्यासाठी पूर्तता करून घेण्याचे आदेश प्रशासनाला देण्यात आले.
नागरिकांना जन्मदाखले, ना-हरकत प्रमाणपत्र, तसेच नगरपालिकेशी संबंधित विविध कागदपत्रे उपलब्ध करून देण्यासाठी नागरी सुविधा केंद्र उभारण्यात यावे, ठेकेदारी पद्धतीने पार्किंग व्यवस्था सुरू करणे, शहरातील पाईप गटारकामे व रस्ते काँक्रिटीकरणाच्या कामांना सभेत मंजुरी देण्यात आली.
सन २०१७-२०१८ साठी दलित वस्ती, दलितेतरवस्ती, जिल्हा नगरोत्थान १४ वा वित्त आयोग आदी विविध योजनाअंतर्गत प्रस्ताव पाठविण्याचे आदेश प्रशासनाला देण्यात आले. (वार्ताहर)

Web Title: Shivrajaya's name at the entrance of Junnar city

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.