Hanuman Jayanti 2024: मंगळवारी हनुमान जयंती आल्यामुळे 'या' पाच चुका आज आवर्जून टाळा!

By ऑनलाइन लोकमत | Published: April 23, 2024 11:56 AM2024-04-23T11:56:45+5:302024-04-23T12:04:53+5:30

Hanuman Jayanti 2024: आज हनुमान जन्मोत्सव! आजची तीथी मंगळवारी आल्याने या उस्तवाचे महत्त्व अधिकच वाढले आहे! कारण शनिवार जसा मारुतीरायाचा मानतो, तसाच मंगळवार सुद्धा त्याच्या उपासनेसाठी राखीव ठेवला आहे. म्हणून हनुमंताची उपासना करताना मंगळवार आणि शनिवार या दोन्ही दिवशी काही चुका अवश्य टाळा आणि त्याची सुरुवात आजपासून करा!

Tuesday Hanuman Tips: श्रीराम भक्त बजरंग बली, हे भक्ती, युक्ती आणि शक्तीच्या बाबतीत अग्रेसर मानले जातात. बजरंग बली हे अतिशय शिस्तप्रिय म्हणूनही ओळखले जातात. म्हणूनच न्यायाची देवता शनी यांची आणि मारुती रायाची घनिष्ट मैत्री दिसून येते. मात्र, तुम्ही जर त्यांचे उपासक असाल किंवा साडेसाती काळात त्यांची उपासना करत असाल तर तुम्हाला काही नियम पाळणे बंधनकारक ठरेल. त्या नियमांचे पालन केले, तरच तुम्हाला शनी आणि मारुती या दोघांची कृपा प्राप्त होईल. जाणून घेऊया ते नियम!

तुमचा साखरपुडा होणार असेल, तर त्याची मुख्य खरेदी अर्थात अंगठीची खरेदी या दोन दिवशी करू नका. लग्न ठरण्यासाठी मारुती रायाची उपासना करा सांगितले जात असले तरीही दोन जीवांना परस्पराशी जोडणारी अंगठी मंगळवारी किंवा शनिवारी खरेदी करू नये.

बलसंवर्धनासाठी हनुमंताला आदर्श मानले जाते, म्हणून मंगळवारी आणि शनिवारी सात्विक आहार घ्यावा असे सांगितले जाते. जेणेकरून शरीराला आणि बुद्धीला जडत्व येणार नाही आणि भक्तीला शक्तीचीही जोड मिळेल.

मंगळवारी नखे कापली, केस कापले तरी हरकत नाही, परंतु शनिवारी या गोष्टी प्रकर्षाने टाळाव्यात. कारण शनी देवांना स्वच्छता प्रिय असली, तरीदेखील त्यांच्या वारी या गोष्टी केल्याचे त्यांना आवडत नाहीत. याउलट दानधर्म, गरजूंना मदत, ज्येष्ठांची सेवा त्यांना विशेष आवडते.

मंगळवारी आणि शनिवारी नवीन कपडे घालणे टाळा. नवीन कपड्यांचे उदघाटन करायचे असेल तर गुरुवारचा दिवस शुभ मानला जातो. जर वस्त्रदान करणार असाल तर मात्र कोणत्याही दिवसाचे बंधन नाही.

मंगल दोष टाळायचा असेल तर मंगळवारी काळे कपडे घालणे टाळा. हनुमंताला आणि शनी देवाला शेंदरी रंग प्रिय आहे. या दोन्ही दिवशी काही मुख्य कामे करावयाची असल्यास पिवळा, केशरी, लाल रंगाचे कपडे घाला, लाभ होईल!