गोरे होण्यासाठी क्रीम लावताय? मग आता तर थांबाच! वाचा धक्कादायक कारण...

By ऑनलाइन लोकमत | Published: April 18, 2024 05:18 AM2024-04-18T05:18:37+5:302024-04-18T05:19:49+5:30

एमएन हा एक ऑन्टोइम्युन आजार असून, यात नेफ्रोटिक सिंड्रोम होतो.

Whitening cream Then stop now Because it's dangerous | गोरे होण्यासाठी क्रीम लावताय? मग आता तर थांबाच! वाचा धक्कादायक कारण...

गोरे होण्यासाठी क्रीम लावताय? मग आता तर थांबाच! वाचा धक्कादायक कारण...

लोकमत न्यूज नेटवर्क, नवी दिल्ली : भारतात त्वचा गोरी करण्याची इच्छा असलेल्या लोकांची संख्या अधिक असल्याने फेअरनेस क्रीमची बाजारपेठ नेहमी तेजीत असते. मात्र या फेअरनेस क्रीमचा सतत वापर केल्याने देशभरात किडनीच्या समस्या वाढत असल्याचे फेअरनेस क्रीम्सवरील नवीन संशोधनात समोर आले आहे. केरळच्या  रुग्णालयातील डॉक्टरांनी हे संशोधन केले आहे.

मेडिकल जर्नल किडनी इंटरनॅशनल या नियतकालिकामध्ये प्रकाशित झालेल्या संशोधनानुसार, या क्रीममध्ये पारा हा रासायनिक घटक मोठ्या प्रमाणात असतो. त्यामुळे किडनी खराब होते. फेअरनेस क्रीम्सच्या वाढत्या वापरामुळे, मेम्ब्रेनस नेफ्रोपॅथी (एमएन) चे रुग्ण वाढत आहेत. 

रक्त पेशी तुटल्या जाण्याची भीती
एमएन हा एक ऑन्टोइम्युन आजार असून, यात नेफ्रोटिक सिंड्रोम होतो. संशोधनादरम्यान रुग्णामध्ये सेरेब्रल व्हेन थ्रोम्बोसिस देखील आढळला. यामध्ये मेंदूमध्ये रक्ताची गुठळी जमा होते. हे मेंदूमधून रक्त वाहून जाण्यापासून रोखते. यामुळे रक्त पेशी तुटल्या जाण्याची आणि रक्तस्त्राव होण्याची भीती असते.

Web Title: Whitening cream Then stop now Because it's dangerous

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.