Video: पाळीव कुत्र्याचा सहा वर्षीय चिमुकलीवर हल्ला; धक्कादायक व्हिडिओ व्हायरल...

By ऑनलाइन लोकमत | Published: April 30, 2024 10:10 PM2024-04-30T22:10:02+5:302024-04-30T22:10:47+5:30

Dog Attack Video: गेल्या काही काळापासून कुत्र्याने हल्ला केल्याच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे.

Dog Attack Video: Pet dog attacks six-year-old child; Shocking video viral | Video: पाळीव कुत्र्याचा सहा वर्षीय चिमुकलीवर हल्ला; धक्कादायक व्हिडिओ व्हायरल...

Video: पाळीव कुत्र्याचा सहा वर्षीय चिमुकलीवर हल्ला; धक्कादायक व्हिडिओ व्हायरल...

Dog Attack Video : गेल्या काही महिन्यांमध्ये कुत्र्यांच्या हल्ल्याच्या अनेक घटना समोर आल्या आहेत. यातील काही घटनांमध्ये कुत्र्यांनी माणसाचा जीव घेतल्याचेही घडले आहे. अशातच, पाळीव कुत्र्याच्या हल्ल्याचे आणखी एक प्रकरण समोर आले आहे, ज्यामध्ये एका पाळीव जर्मन शेफर्ड कुत्र्याने सोसायटीमध्ये खेळणाऱ्या मुलीवर अचानक हल्ला केला. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, हे प्रकरण गाझियाबादचे आहे. व्हायरल व्हिडिओमध्ये दिसते की, एक महिला आपल्या पाळीव जर्मन शेफर्डला फिरवण्यासाठी सोसायटीच्या बाहेर येते. यावेळी एक चिमुकली तिथेच सायकल चालवत असते, तेवढ्यात अचानक कुत्रा तिच्यावर हल्ला करतो. तो चिमुकलीचा चावा घेण्याचा प्रयत्न करतो, तर महिला त्याला रोखण्याचा प्रयत्न करते. पण, कुत्रा काही केल्या त्या महिलेला ऐकत नाही. 

मुलीच्या हातावर आणि कमरेला जखमा आहेत
अखेर आजुबाजूच्या महिला तिथे येतात आणि त्या कुत्र्याला दूर करतात. या हल्ल्यात मुलीच्या हातावर आणि कमरेवर जखमा झाल्याची माहिती समोर आली आहे. याप्रकरणी मुलीच्या कुटुंबीयांनी पोलिसांत तक्रार केली आहे. 
 

Web Title: Dog Attack Video: Pet dog attacks six-year-old child; Shocking video viral

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.