VIDEO - इस्त्रोने एकाचवेळी 31 उपग्रहांचे केले यशस्वी प्रक्षेपण

By admin | Published: June 23, 2017 09:35 AM2017-06-23T09:35:21+5:302017-06-23T10:18:23+5:30

भारतीय अवकाश संशोधन संस्था इस्त्रोने शुक्रवारी सकाळी आंध्रप्रदेशच्या श्रीहरीकोटा येथून PSLV-C38 रॉकेटव्दारे 31 उपग्रहांचे प्रक्षेपण केले.

VIDEO - Successful launch of 31 satellites at the same time | VIDEO - इस्त्रोने एकाचवेळी 31 उपग्रहांचे केले यशस्वी प्रक्षेपण

VIDEO - इस्त्रोने एकाचवेळी 31 उपग्रहांचे केले यशस्वी प्रक्षेपण

Next

 ऑनलाइन लोकमत 

नवी दिल्ली, दि. 23 - भारतीय अवकाश संशोधन संस्था इस्त्रोने पुन्हा एकदा एकाचवेळी अनेक उपग्रह यशस्वीरित्या प्रक्षेपित करुन आपले कौशल्य सिद्ध केले आहे. इस्त्रोने शुक्रवारी सकाळी PSLV-C38  रॉकेटव्दारे 31 उपग्रहांचे प्रक्षेपण केले. सकाळी 9 वाजून 29 मिनिटांनी PSLV-C38 रॉकेटने श्रीहरीकोटा येथील सतीश धवन अवकाश तळावरुन उड्डाण केले. त्यानंतर 16 मिनिटांनी पीएसएलव्हीने कार्टोसॅट - 2 मालिकेतील उपग्रहासह अन्य 29 नॅनो उपग्रहांना आपल्या कक्षेत सोडले. इस्त्रोच्या पीएसएलव्हीचे हे 40 वे उड्डाण होते. 31 उपग्रहांमध्ये भारताचे दोन आणि 29 परदेशी उपग्रह आहेत. या उपग्रहांमध्ये कार्टोसॅट -2 मालिकेतील सहावा उपग्रह प्रक्षेपित करण्यात आला असून कार्टोसॅटमुळे भारताची टेहळणी क्षमता वाढणार आहे. कार्टोसॅटचे वजन 712 किलो असून, अन्य 30  उपग्रहांचे मिळून 243 किलो वजन आहे.  
 
फ्रान्स, जर्मनी, इटली, जापान असे 14 देशांचे 29 नॅनो उपग्रह सुद्धा प्रक्षेपित करण्यात आले आहेत. तामिळनाडूसाठी सुद्धा हे प्रक्षेपण महत्वाचे आहे. कारण कन्याकुमारी जिल्ह्यातील नुरुल इस्लाम विद्यापीठातील विद्यार्थ्यांनी बनवलेला उपग्रह अवकाशात पाठवण्यात आला आहे. शेती पीक आणि आपत्ती व्यवस्थापनामध्ये या उपग्रहाची मदत होईल. इस्त्रोने याआधी फेब्रुवारी महिन्यात एकाचवेळी 104 उपग्रह प्रक्षेपित करुन इतिहास रचला होता. 
 
आणखी वाचा 
भारताने दाखवला ‘१०४ का दम’, इस्त्रोचा विश्वविक्रम
ISRO समोर असते अवकाश कच-यापासून उपग्रह वाचवण्याचे आव्हान
 
PSLV- C37 या स्वदेशी बनावटीच्या प्रक्षेपकाच्या सहाय्याने हे उपग्रह अवकाशात सोडण्यात आले.रशियाच्या अंतराळ संस्थेने एका वेळी ३७ उपग्रहांचे यशस्वी प्रक्षेपण केले होते. त्या तुलनेत भारताचे हे यश मोठे आहे. यापूर्वी भारताने जून २०१५ मध्ये २३ उपग्रहांचे एकाच वेळी प्रक्षेपण केले होते. भारतीय शास्त्रज्ञांनी एक्सएल व्हॅरिएंट या रॉकेटचा वापर केला असून सर्वांत शक्तिशाली या रॉकेटचा वापर यापूर्वी भारताने महत्त्वाकांक्षी चांद्रयान व मंगळ मोहिमेसाठी केला होता.
 
अशी कामगिरी करणारा भारत पहिला देश
पीएसएलव्हीने २१४ किलो वजनाच्या कार्टोसॅट-२ साखळीतील उपग्रहाचे प्रक्षेपण केले आहे. त्याचा उपयोग पृथ्वीवर देखरेख ठेवण्यासाठी केला जाईल. त्यानंतर १०३ सहयोगी उपग्रहांना पृथ्वीपासून ५२० कि.मी. अंतरावरील कक्षेत समाविष्ट केले जाईल.त्यांचे एकूण वजन ६६४ आहे. यातील ९६ उपग्रह अमेरिकेचे आहेत, तर पाच उपग्रह हे इस्रोचे आंतरराष्ट्रीय ग्राहक इस्रायल, कजाकिस्तान, नेदरलँड, स्वित्झर्लंड, संयुक्त अरब अमिरातचे आहेत.
 
 
#WATCH ISRO launching PSLV-C38 rocket on a mission to put 31 satellites into orbit from Sriharikota https://t.co/9s3uzWqmoQ

Web Title: VIDEO - Successful launch of 31 satellites at the same time

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.