"खलिस्तानवर नियंत्रण ठेवण्याची गरज", ब्रिटनच्या NSA सोबत अजित डोवालांची चर्चा

By ऑनलाइन लोकमत | Published: May 9, 2024 08:34 PM2024-05-09T20:34:44+5:302024-05-09T20:35:31+5:30

NSA Ajit Doval On Khalistan : अजित डोवाल यांच्याशी झालेल्या भेटीदरम्यान तंत्रज्ञान आणि सुरक्षा यासारख्या मुद्द्यांवर भाष्य करण्यात आले.

UK NSA meets Ajit Doval and Jaishankar, security, technology, khalistan and sikh radicalisation concern, regional affairs on top agenda | "खलिस्तानवर नियंत्रण ठेवण्याची गरज", ब्रिटनच्या NSA सोबत अजित डोवालांची चर्चा

"खलिस्तानवर नियंत्रण ठेवण्याची गरज", ब्रिटनच्या NSA सोबत अजित डोवालांची चर्चा

नवी दिल्ली : ब्रिटनचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार (NSA) टिम बॅरो यांनी गुरुवारी भारताचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांची भेट घेतली. दरम्यान, टिम बॅरो दोन दिवसांच्या भारत दौऱ्यावर आले आहेत. यादरम्यान त्यांनी परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांचीही भेट घेतली. अजित डोवाल यांच्याशी झालेल्या भेटीदरम्यान तंत्रज्ञान आणि सुरक्षा यासारख्या मुद्द्यांवर भाष्य करण्यात आले.

बैठकीत अजित डोवाल यांनी ब्रिटनमधील वाढत्या शीख कट्टरवादावर चिंता व्यक्त केली. तसेच, खलिस्तानी घटकांवर नियंत्रण ठेवण्याची गरज असल्याचे सांगितले. दरम्यान, खलिस्तान समर्थकांनी लंडनमध्ये नुकत्याच केलेल्या हिंसक निषेधाच्या घटना पाहता हा मुद्दा उपस्थित करण्यात आला. ज्यामध्ये खलिस्तान लिबरेशन फोर्स (KLF) नेते अवतार सिंग खांडा यांनी मार्च 2023 मध्ये आयोजित केलेल्या निषेधाचाही समावेश होता.

दरम्यान, सुरक्षा, तंत्रज्ञान आणि प्रादेशिक घडामोडींसह विविध आघाड्यांवर सहकार्य अधिक दृढ करण्याच्या उद्देशाने दोन्ही देशांच्या एनएसएच्या नेतृत्वाखालील उच्चस्तरीय संवादामध्ये सहभागी होण्यासाठी टिम बॅरो दोन दिवसांच्या भारत भेटीवर आले आहेत. यादरम्यान परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनीही टिम बॅरो यांच्याशी अनेक द्विपक्षीय, प्रादेशिक आणि जागतिक मुद्द्यांवर चर्चा केली.

परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी एक्सवर लिहिले की, "आज दिल्लीत ब्रिटनच्या एनएसए टिम बॅरो यांना भेटून आनंद झाला. अनेक महत्त्वाच्या प्रादेशिक आणि जागतिक मुद्द्यांवर चर्चा केली. तसेच, आमच्या द्विपक्षीय संबंधातील प्रगतीचा आढावा घेतला." दरम्यान, परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर आणि बॅरो यांनी पश्चिम आशियातील परिस्थितीवरही चर्चा केल्याचे समजते. या भेटीमुळे दोन्ही देशांमधील सर्वसमावेशक धोरणात्मक भागीदारी अधिक मजबूत आणि व्यापक होण्याची अपेक्षा आहे.

Web Title: UK NSA meets Ajit Doval and Jaishankar, security, technology, khalistan and sikh radicalisation concern, regional affairs on top agenda

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.