माेदी लाटेतही तरला होता काँग्रेसचा गड, आता काय? किशनगंजमध्ये कुणाचा वरचष्मा? 

By ऑनलाइन लोकमत | Published: April 18, 2024 05:40 AM2024-04-18T05:40:36+5:302024-04-18T05:41:58+5:30

गेल्यावेळी बिहारमध्ये केवळ याच एकमेव जागेवर मो. जावेद यांच्या रूपाने काँग्रेसला विजय मिळाला.

stronghold of Congress was lost even in the Modi wave, Who's top in Kishanganj | माेदी लाटेतही तरला होता काँग्रेसचा गड, आता काय? किशनगंजमध्ये कुणाचा वरचष्मा? 

माेदी लाटेतही तरला होता काँग्रेसचा गड, आता काय? किशनगंजमध्ये कुणाचा वरचष्मा? 

राजेश शेगाेकार, लोकमत न्यूज नेटवर्क
पाटणा
: नेपाळ आणि बांगलादेशची आंतरराष्ट्रीय सीमा, पश्चिम बंगालच्या देशांतर्गत सीमेला लागून असलेला तसेच देशातील दुसऱ्या क्रमांकाची मुस्लिम लोकसंख्या असलेला किशनगंज हा लाेकसभा मतदारसंघ माेदी लाटेतही भाजप नेतृत्वात एनडीए जिंकू शकला नाही. गेल्यावेळी बिहारमध्ये केवळ याच एकमेव जागेवर मो. जावेद यांच्या रूपाने काँग्रेसला विजय मिळाला. आता ते पुन्हा रिंगणात असून त्यांची लढत जेडीयूचे  मुजाहिद आलम यांच्याशी हाेत आहे.  सुुरुवातीला सरळ वाटणाऱ्या या लढतीत एमआयएमने उडी घेतल्याने सामना तिरंगी झाला आहे. निवडणूक ही पूर्णपणे धार्मिक समीकरणांवरच ठरते. गेल्यावेळी काँग्रसेचे खासदार मोहम्मद जावेद ३४ हजार मतांनी विजयी झाले हाेते.

निवडणुकीतील कळीचे मुद्दे
- जिल्ह्यात दरवर्षी शेकडो एकर जमीन पुरामुळे नदीत बुडते. 
राेजगाराअभावी स्थलांतराचाही मुद्दा आहे. मात्र हा मुद्दा निवडणुकीत प्रभावी ठरत नाही, असे दिसते.
- हा मतदारसंघ शैक्षणिक क्षेत्रात संपूर्ण देशात सर्वांत खालच्या क्रमांकावर आहे.
- भाजपची पारंपरिक मते मिळवण्यात जनता दल युनायटेड यशस्वी झाला तर जेडीयूचे पारडे जड ठरेल.

२०१९ मध्ये काय घडले ?
मो. जावेद (विजयी) (काँग्रेस) ३,६७,०१७
महमूद अशरफ (जेडीयू) ३,३२,५५१

Web Title: stronghold of Congress was lost even in the Modi wave, Who's top in Kishanganj

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.