वैद्यकीय तज्ज्ञांकडून दिलासा! 'कोविशिल्ड' घेतलेल्यांनी चिंता करू नये; टीटीएस आजार होणे ही दुर्मीळ घटना

By ऑनलाइन लोकमत | Published: May 1, 2024 06:40 AM2024-05-01T06:40:16+5:302024-05-01T06:40:56+5:30

दुष्परिणाम नेमक्या कशामुळे झाले हे सांगणे कठीण असते, असे जनरल पीपल्स हेल्थ ऑर्गनायझेशन-इंडियाचे सरचिटणीस डॉ. ईश्वर म्हणाले.

Covishield should not worry Relief from medical experts TTS disease is a rare phenomenon | वैद्यकीय तज्ज्ञांकडून दिलासा! 'कोविशिल्ड' घेतलेल्यांनी चिंता करू नये; टीटीएस आजार होणे ही दुर्मीळ घटना

वैद्यकीय तज्ज्ञांकडून दिलासा! 'कोविशिल्ड' घेतलेल्यांनी चिंता करू नये; टीटीएस आजार होणे ही दुर्मीळ घटना

नवी दिल्ली : अॅस्ट्राझेनेकाने विकसित केलेल्या व सीरम इन्स्टिट्यूटने ऑफ इंडियाकडून उत्पादित 'कोविशिल्ड' या कोरोना प्रतिबंधक लसीमुळे दुर्मिळ प्रकरणांत रक्ताच्या गुठळ्या होणे व प्लेटलेट्स कमी होण्याचा धोका असतो. त्या आजाराला थ्रोम्बोसिस वुईथ थ्रोम्बोसायटोपेनिया सिंड्रोम (टीटीएस) असे म्हणतात. हे दुष्परिणाम अॅस्ट्राझेनेकानेच लंडन कोर्टात मान्य केले असले तरी त्यामुळे लोकांनी चिंता करून नये,असे दुष्परिणाम खूपच कमी लोकांवर होतात, असे वैद्यकीय तज्ज्ञांनी स्पष्टे केले आहे.

दुष्परिणाम नेमक्या कशामुळे झाले हे सांगणे कठीण असते, असे जनरल पीपल्स हेल्थ ऑर्गनायझेशन-इंडियाचे सरचिटणीस डॉ. ईश्वर म्हणाले.

लसीमुळे अनेक गोष्टींचा धोका होतो कमी

■ इंडियन मेडिकल असोसिएशनच्या कोरोनाविषयक कृती दलाचे को- चेअरमन डॉ. राजीव जयदेवन म्हणाले की, ज्यांनी लस घेतली आहे त्यांना कोरोनाने मृत्यू किंवा बरे झाल्यानंतर हृदयविकाराचा झटका, पक्षाघात होण्याचा धोका कमी असतो. ■ लसींचे होणारे फायदे अधिक
आहेत. अमेरिकेत लस घेण्यास नकार देणारे वा घेण्यास घाबरलेल्यांपैकी २,३२,००० ते ३,१८,००० लोकांचा कोरोनामुळे मृत्यू झाला होता.

Web Title: Covishield should not worry Relief from medical experts TTS disease is a rare phenomenon

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.